कॉपी पुरविणारे तीन शिक्षक शहाद्यात निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:30 PM2018-03-10T12:30:17+5:302018-03-10T12:30:17+5:30

Three teachers providing copies suspiciously | कॉपी पुरविणारे तीन शिक्षक शहाद्यात निलंबीत

कॉपी पुरविणारे तीन शिक्षक शहाद्यात निलंबीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी पुरविणा:या शहादा केंद्रातील दोन शिक्षकांना निलंबीत केले असून एकाचा प्रस्ताव प्रकल्प अधिका:यांकडे पाठविण्यात आला आहे.
जितेंद्र राजाराम पाटील, कमलेश एकनाथ पाटील दोन्ही शेठ व्हि.के.शहा विद्यालय व प्रवीण बन्सीलाल पाटील, नवलपूर शासकीय आश्रमशाळा या शिक्षकांचा समावेश आहे. प्रवीण पाटील यांचा प्रस्ताव आदिवासी प्रकल्प कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. दहावीच्या इंग्रजीच्या पेपरच्या वेळी शहादा येथील शेठ व्हि.के.शहा विद्यालयाच्या केंद्रावर कॉपी सुरू होती. यासंदर्भातील व्हिडीओ काढण्यात आला होता. त्या प्रकाराची दखल घेवून जिल्हाधिका:यांनी शिक्षणाधिकारी राहुल चौधरी व गट शिक्षणाधिकारी ए.डी.पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती तिन्ही शिक्षक दोषी आढळले आहे. दरम्यान, यापुढे असे प्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिका:यांनी स्पष्ट केले.

Web Title: Three teachers providing copies suspiciously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.