तीन हजार शेतक:यांच्या खात्यावर पडली भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:14 PM2019-12-02T12:14:42+5:302019-12-02T12:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसानग्रस्त 10 हजार शेतक:यांपैकी 3 हजार शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसानग्रस्त 10 हजार शेतक:यांपैकी 3 हजार शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आह़े महसूल प्रशासनाने शेतक:यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली आह़े उर्वरित दुस:या टप्प्यातील भरपाईचा प्रस्ताव प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठवला आह़े
ऑक्टोबर महिन्यात क्यार व महा या दोन चक्री वादळांमुळे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून काढणीवर आलेल्या खरीप पिकांसह कापूस, मिरची, केळी, पपई, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले होत़े एकूण 5 हजार 818 हेक्टरवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात 10 हजार 885 बाधित शेतक:यांसाठी 3 कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्त यांच्याकडे नोंदवली होती़ प्रस्तावानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रासाठी 8 तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर झाली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होत़े
या अनुदानाचे वितरण 99 टक्के पूर्ण झाले असून त्यानुसार पाच तालुक्यांमध्ये रकमेचे वितरण झाले आह़े उर्वरित सात हजार शेतक:यांना अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु राहणार असून दोन कोटी रुपयांचा हा निधी नेमका कधी मिळणार याकडे शेतक:यांचे लक्ष लागून राहणार आह़े
नंदुरबार जिल्हा प्रशासनाने 3 हजार 152 शेतक:यांच्या खात्यावर 30 नोव्हेंबर रोजी 1 कोटी 13 लाख 56 हजार रुपयांचे वितरण केले आह़े यात नंदुरबार तालुक्यातील 78 शेतक:यांना 4 लाख 41 हजार, नवापुर तालुक्यात 1 हजार 550, शहादा 509, धडगाव तालुक्यातील 293 शेतक:यांना प्रत्येकी 27 लाख 21 हजार तर अक्कलकुवा तालुक्यातील 711 शेतक:यांना 27 लाख 19 हजार रुपयांची भरपाई वितरीत करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यातील 11 बाधित शेतक:यांच्या खात्यावर 33 हजार रुपयांच्या रकमेचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात 78, नवापुर 1 हजार 593, शहादा 2 हजार 68, तळोदा 8, अक्कलकुव 3 हजार 965 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांच्या पिकांचे नुकसान झाले होत़े एकूण 10 हजार 885 शेतक:यांचे नुकसान झाल्यानंतर त्यासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम दिली होती़ दुस:या टप्प्यात 7 हजार 733 शेतक:यांना 2 कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित असून ती नेमकी कधी मिळणार, याबाब प्रशासनाकडेही ठोस अशी माहिती नाही़ परंतू ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
प्रशासनाकडून हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे 3 हजार 144 शेतक:यांना 1 कोटी 12 लाख 86 हजार 240 रुपयांचे वाटप केले आहेत़ तर बागायत क्षेत्रात 18 हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे आठ शेतक:यांना 72 हजार रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आह़े हे सर्व आठ शेतकरी शहादा तालुक्यातील आहेत़ तर कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी हे सर्वच तालुक्यातून आहेत़ दुस:या टप्प्यातील रकमेतही बागायत आणि कोरडवाहू अशा बाधित शेतक:यांना मदत देण्याची कारवाई होणार आह़े शनिवारी शेतक:यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे त्यांना सोमवारी सकाळपासून काढता येणे शक्य होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आह़े