संपात तीन हजार कर्मचारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:00 PM2020-01-10T12:00:13+5:302020-01-10T12:00:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध घटकातील मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार संघटनांसह विविध संघटनांमार्फत देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विविध घटकातील मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार संघटनांसह विविध संघटनांमार्फत देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांचे तीन हजारापेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले.
प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह विविध कामगार मंडळे व विविध घटकातील समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इलेक्ट्रीसिटी बोर्ड वर्कर्स फेडरेशन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्टÑ सेल्स अॅण्ड मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, शालेय पोषण आहार कामगार संघटना, आशा युनियन, ग्रामसेवक संघटना यांच्यासह काही संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलन दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेण्यात आली. त्यानुसार हे कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते, परंतु त्यांनी पाठींबा दिल्याचे सांगण्यात आले. या संपात महसूल, कोषागार, वित्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस दलातील लेखा कर्मचारी यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाल्याचा अंदाज आहेत़
संपात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ़ हेमंत देवकर, सरचिटणीस सुभाष महिरे, संजय मोरे, स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड वर्कर्स फेडरेशनचे योगेश सोनार, ललीत चंदणे, प्रकाश पवार, मनिलाल गांगुर्डे, गुण्या गवळी, ग्रामविस्तार अधिकारी रवींद्र वळवी यांच्यासह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.