नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

By admin | Published: April 9, 2017 01:02 PM2017-04-09T13:02:34+5:302017-04-09T13:02:34+5:30

तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे.

Three years in Nandurbar district, only one gaanta-free | नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

Next

 ऑनलाई लोकमत/मनोज शेलार  

नंदुरबार, दि.9- तंटामुक्तीत जिल्ह्याचा आलेख गेल्या तीन वर्षापासून खाली आला आहे. तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे. 
शासनाने गावांची सुधारणा आणि विकासासाठी  विविध योजनांची घोषणा दहा वर्षापूर्वी केली होती. त्यातीलच एक तंटामुक्ती गाव योजना. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटावे, गावातील एकोपा कायम राहावा, सामाजिक सलोखा टिकावा यासह इतर उद्देशाने 14 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. योजनेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तंटे गावातच सामोपचाराने मिटले. परिणामी न्यायालय आणि पोलिसांवरील ताण ब:याच प्रमाणात मिटला होता. पहिल्याच वर्षी राज्यात लाखोंच्या संख्येने तर जिल्ह्यात काही हजार तंटे निकाली निघाले होते. त्यामुळे दरवर्षी ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल अशी अपेक्षा असतांना मात्र, त्या योजनेकडे दुर्लक्षच झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 2007-08 नंतर उतरत्या क्रमाने गावे तंटामुक्त होत गेली. गेल्या तीन ते चार वर्षात प्रतिसाद अतिशय थंड आहे. पोलीस विभागाने देखील आपल्यावरील इतर ताण लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापासून तर एकही  गाव तंटामुक्त झालेले नाही. यंदा एकही प्रस्ताव जिल्ह्यातून नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतींच्या तुलनेत तंटामुक्त गावांची टक्केवारी 60 टक्केपेक्षा अधीक आहे हे विशेष.
स्पर्धा आणि चढाओढ
आठ वर्षापूर्वी या योजनेत सहभागी होण्यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा आणि चढाओढ निर्माण झाली होती. शासनाने ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या निकषानुसार बक्षीसांची रक्कम ठरविली आहे. त्यामुळे अनेक गावांना लाखांची बक्षीसे मिळाली आहेत. या बक्षीस रक्कमेतून गावांनी विविध उपक्रम देखील राबविले. त्याचा फायदा गाव विकासाला झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. परंतू नंतर या योजनेची व्याप्ती आणि निकाल घोषीत करण्यासाठीची गुंतागुंत पहाता पोलीस दलाने देखील नंतर काही प्रमाणात दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
उत्सवांना मर्यादा
याअंतर्गत सण, उत्सव साजरे करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. ब:याच गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली गेली. या संकल्पेनेला देखील योजनेअंतर्गत गुण होते. त्यामुळे अनेक गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या एकवर आली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. ती प्रथा आजही अनेक गावांनी कायम ठेवली आहे. त्याचा फायदा पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होण्यात तर झालाच शिवाय गावागावातील याअंतर्गत स्पर्धा आणि चढाओढ देखील कमी झाली आहे. परिणामी गावाअंतर्गत भांडणे आणि वाद कमी झाले आहेत.
तंटामुक्तीसारखी योजना दुरगामी परिणाम करणारी ठरली. परंतू काही वर्षातच आलेली उदासिनता तिचे महत्त्व कमी करून जात आहे.

Web Title: Three years in Nandurbar district, only one gaanta-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.