सुकाणू समितीतर्फे विसरवाडीत रास्तारोको व जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:14 PM2018-05-15T13:14:23+5:302018-05-15T13:14:23+5:30

आंदोलकांसोबत अधिका:यांची चर्चा : दोन तास वाहतूक ठप्प

Through the Steering Committee, Rastaroko and Jail Bharo are in forgiveness | सुकाणू समितीतर्फे विसरवाडीत रास्तारोको व जेलभरो

सुकाणू समितीतर्फे विसरवाडीत रास्तारोको व जेलभरो

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : शेतमालाला हमीभाव, संपूर्ण कजर्माफी तसेच जिल्ह्यातील पात्र शेतक:यांच्या सुधारित याद्यानुसार कर्ज वाटप यासह विविध 11 मागण्यांसाठी राज्य सुकाणू  समिती आणि सत्यशोधक शेतकरी संघटना यांच्यातर्फे विसरवाडी येथे रास्तारोको आणि जेलभरो आंदोलन करण्यात आल़े दुपारी 1 वाजेपासून सुरू झालेले आंदोलन सायंकाळी उशिरार्पयत सुरू होत़े 
विसरवाडी गावातील सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून कुंभारगल्ली, मशिद मार्गाने धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 र्पयत मोर्चा काढण्यात आला़ यानंतर आंदोलक रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास बसले, त्यांच्याकडून घोषणा देण्यात येत होत्या़ रास्तारोको दरम्यान नवापूरचे तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी आऱबी़पवार, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, सहायक गटविकास अधिकारी बी़डी़वसावे, तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय चौधरी, पोलीस उपनिरीक्षक देविदास बि:हाडे  यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली़ दीड तासानंतर रास्तारोको करणा:या आंदोलकांना विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात तहसीलदार व अधिकारी यांच्यासह सर्व बँकांच्या अधिका:यांनी आंदोलकांसोबत चर्चा करत त्यांना पात्र शेतक:यांच्या याद्या दिल्या़ वनदाव्यांबाबत उशिरार्पयत चर्चा करण्यात येत होत़े यावेळी सत्यशोधक संघटनेचे रामसिंग  गावीत, जगन गावीत, साजूबाई गावीत, दिलीप गावीत, रामा गावीत, रणजित गावीत, लाजरस गावीत, कांतीलाल गावीत, होमाबाई गावीत, ामेश गावीत, सिंगा वळवी उपस्थित होत़े रास्तारोकोस्थळी अधिका:यांना निवेदन देण्यात आल़े यात वीजबिल मुक्तीसह सरसकट व संपूर्ण कजर्मुक्ती करा, राहून गेलेले वनहक्क दावे स्विकारून दाव्यांची जीपीएस मशिनमार्फत मोजणी करा, नवापूर तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकरी व वनहक्क दावेदारांना तात्काळ भरपाई द्यावी, स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या शिफारशी लागू करा, बैलहत्याबंदी, भूसंपादन सेझ, वनसेझ, कंपनीशेती या शेतकरी विरोधी कायद्यांना रद्द करा, वनहक्कानुसार प्रमाणपत्रधारकांना बॅक कर्ज पुरवठा आदी मागण्या करण्यात आल्या़ 
 

Web Title: Through the Steering Committee, Rastaroko and Jail Bharo are in forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.