ठेंगचे शिवारात बिबटय़ाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:51 AM2017-08-14T11:51:05+5:302017-08-14T11:51:14+5:30

शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण : हिंसक प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा

Thunderbolt threw the leopard | ठेंगचे शिवारात बिबटय़ाचा थरार

ठेंगचे शिवारात बिबटय़ाचा थरार

googlenewsNext
ठळक मुद्दे बिबटय़ाची जोडी असल्याचा अंदाज 4दरम्यान, परिसरात बिबटय़ाची जोडी असल्याचा अंदाज अनेकांकडून वर्तविण्यात येत आह़े यात मादी बिबटयाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान याच परिसरात अनेकांनी बिबटय़ाची जोडी पाहिली असल्याचेही सांगण्यात येत आह़े त्यामुळे य

लोकमत ऑनलाईन
दिनांक 14 ऑगस्ट 
कोठार : शहादा तालुक्यातील ठेंगचेतर्फे बोरद शिवारात बिबटय़ाचा थरार स्थानिकांना अनुभवायला मिळाला आह़े रविवारी अगदी गावालगत बिबटा आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आह़े
रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा बिबटा बोरद ते शहादा रस्त्यावरील ठेंगचे गावालगतच्या उसाच्या शेतातून निघाला व रस्ता ओलांडत दुस:या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात गेला़ अचानक रस्त्यावरुन बिबटय़ाचे दर्शन झाल्याने रस्त्यावरील वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडाली़ काहींचा तर चांगलाच थरकाप उडाल्याने त्यांनी पुढे जाण्याचे नियोजन वगळता पुन्हा माघारी फिरणेच पसंत केल़े 
अचानक समोरुन बिबटा गेल्याने उपस्थित चांगलेच चकीत झाले                 होत़े प्रथम दर्शनी काहींना समोरुन कुत्रा गेल्यासारखा भास झाला़                परंतु नंतर बिबटा  कपाशीच्या             शेतात गेल्यानंतर अनेकांना तो बिबटाच असल्याची खात्री                झाली़
कपाशीच्या शेतात निंदणीचे काम पूर्ण झाल्याने शेतात गवताचे प्रमाण कमी होत़े त्यामुळे रस्त्यावर असलेल्या उपस्थितांना पाहून             बिबटा कपाशीच्या झाडाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होता़
सुमारे 15 मिनिटांनंतर बिबटा शेताच्या दुस:या बांदावर पोहचला़ आडोश्याच्या मागे गेल्याने बिबटय़ाला पाहणारे वाहनधारकही नंतर मार्गस्थ झाल़े 
मागील वर्षभरापासून शहादा तालुक्यातील परिवर्धा, त:हाडी, सोनवल, ठेंगचे, जावदेतर्फे बोरद, औरंगपूर, कुढावद आदी गावांच्या शिवारात सातत्याने बिबटय़ासह अस्वल व अन्य जंगली हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याचे आढळून आले आह़े 
मागील वर्षी सोनवल गावाच्या शिवारात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ तर तत्पूर्वी परिवर्धा-सोनवल गावांच्या शिवारात बिबटय़ांची तिन पिल्लू आढळून आली होती़ या गावाच्या शेतशिवारात सातत्याने जंगली प्राणी आढळून येत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आह़े वनविभागाने या प्रकाराकडे गंभीरतेने बघण्याची आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े मागील दोन-तीन महिन्यापासून ठेंगचे गावातील अनेकांच्या बक:या बिबटय़ाने फस्त केल्याचीही माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आह़े 
या आधीदेखील परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाले असल्याने त्यामुळे येथील शेतकरी तसेच शेतमजूर बिचकतच कामे करीत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े आता बिबटय़ाचे पुन्हा दर्शन दिले असल्याने शेतक:यांमध्ये तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े 
दरम्यान परिसरात सातत्याने जंगली प्राणी आढळून येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले                आह़े याकडे वन विभागाने लक्ष देऊन बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून जोर धरु लागली   आह़े

Web Title: Thunderbolt threw the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.