वाघांचा निर्णय शासनच घेणार

By admin | Published: November 25, 2015 01:03 AM2015-11-25T01:03:58+5:302015-11-25T01:03:58+5:30

कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितल़े

Tigers will decide the decision | वाघांचा निर्णय शासनच घेणार

वाघांचा निर्णय शासनच घेणार

Next

धुळे : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा याचे अधिकार शासनाचे आहेत़ शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितल़े

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वाघळूद आणि सोनवद खुर्द या दोन गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे करताना 42 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप तत्कालीन जळगाव जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता तथा विद्यमान धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी़ पी़ वाघ यांच्यावर आह़े शाखा अभियंता सुधीर डहाके यांच्यावरदेखील आरोप लावण्यात आला आह़े या दोघांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला़

धरणगाव पोलिसांनी नोंदविलेल्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दोन्ही अभियंते आरोपी आहेत़ जळगावचे तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी़ पी़ सुराणा यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता़ मात्र मूळ फिर्यादी रमेश माणिक पाटील यांनी केलेली याचिका मंजूर करून उच्च न्यायालयाचे औरंगाबाद येथील न्यायमूर्ती टी़व्ही़ नलावडे यांनी 29 जानेवारी रोजी या दोघांचे अटकपूर्व जामीन रद्द केले होत़े त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होत़े मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने त्यांची अपिले फेटाळली़

या घटनेनंतर 3 ते 27 ऑक्टोबर 2015 या कालावधीत वाघ हे वैद्यकीय रजेवर गेले होत़े त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी ते नियमित आपल्या कामावर रुजू झाल़े वर्ग 1 चे अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली करायची की, त्यांना मंत्रालयात परत बोलवायचे याचे अधिकार शासनाचे आहेत़ या आनुषंगाने शासनाकडून जोर्पयत काही आदेश पारित होत नाही, तोर्पयत प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकत नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आल़े

दरम्यान, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले, सदर प्रकरण हे जळगाव जिल्ह्यातील आह़े त्याचा पोलीस तपास सुरू आह़े यासंदर्भात अद्याप चाजर्शीट दाखल झालेले नाही़

ते वर्ग एकचे अधिकारी असल्यामुळे त्यांच्यासंदर्भातील निर्णय शासन पातळीवर होईल़ अद्यापपावेतो त्यांच्या बाबतीत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत़

 

दोन दिवस कोठडी

कार्यकारी अभियंता चंद्रकांत परशराम वाघ व शिपाई अशोक वामन पवार या दोघांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी 3.30 वाजता विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीश कदम यांनी दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Tigers will decide the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.