तिळगूळ वाटप पडले महाग : शहाद्यात दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 05:04 PM2018-01-15T17:04:01+5:302018-01-15T17:04:06+5:30

Tillgul was allocated expensive: Shahadah in which hundreds of crores of rupees were burnt | तिळगूळ वाटप पडले महाग : शहाद्यात दीड लाखांची घरफोडी

तिळगूळ वाटप पडले महाग : शहाद्यात दीड लाखांची घरफोडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील सुवर्ण नगरीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. यात जवळपास एक लाख 44 हजाराचा एवज लंपास झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.
शहरातील डोंगरगाव रोड लगत असलेल्या सुवर्ण नगरीतील प्लॉट नं 67 मध्ये भुपेंद्र अरुण जोशी हे भाडेकरू म्हणून राहतात. ते प्रकाशा येथील जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. मकरसंक्रांत असल्याने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ते सहकुटुंब अमळनेर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता परत आल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडलेले आढळून आले. घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील गोदरेज कपाट व लाकडी कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळला. त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्वरित पोलीसाना पाचारण केले. पोलीस सूत्रानुसार गोदरेज कपाटातून 60 हजार रुपये किमतीची 40 ग्रॅम सोन्याची मंगल पोत, 30 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम सोन्याचा हार, 30 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम सोन्याचा राणीहार तर देवघरातून 15 हजार रुपये किमतीची चांदीची गणपतीची मुर्ती व रोकड 9 हजार रुपये असा एकूण एक लाख 44 हजार रुपयाचा एवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला. या चोरीमुळे परिसरात दशहतीचे वातावरण पसरले आहे . घटनास्थळी शहाद्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,  पो.हे.काँ. बापू धुडकू शिंदेसह पोलीस  कर्मचा:यांनी भेट दिली. या वेळी फिंगर प्रिंट वाल्याना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सुवर्ण नगरीत आत्तार्पयत  दोनवेळा चोरीची घटना घडली आहे. त्याप्रमाणे शहादा शहरात वारंवार घरफोडी, मोटारसायकली चोरी जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने  पोलीसापुढे मोठे आव्हान आहे. शहरासह नवीन वसाहतीत वारंवार होत असलेल्या चोरीमुळे पोलीसांचा चोरांवर असलेला वचक व दबदबा कमी झाल्याचे बोलले जात  आहे.
 

Web Title: Tillgul was allocated expensive: Shahadah in which hundreds of crores of rupees were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.