सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:29 PM2018-02-18T12:29:25+5:302018-02-18T12:29:44+5:30

This is the time to bring the government to power: Planning of attacking movement in Nandurbar | सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ : नंदुरबारात हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना वा:यावर सोडणा:या सरकारला वठणीवर आणण्याची हीच वेळ असून, सर्वाना एकजुटीने आणि मोठय़ा संख्येने हल्लाबोल सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी हल्लाबोल सभेत कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना   केले.
सभेस तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ.योगेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, नगरसेवक इकबाल शेख सलिम, रईस पिंजारी, मुनाफ शाह, शेख खालिद मियाँ, हुसेन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक:यांपासून हातमजुरी करून जगणा:या सर्व सामान्य माणसाला सरकारच्या ध्येय धोरणाचा मोठा फटका बसला आहे. आपण सत्तेत असतांना सर्व सामान्यांसाठी व विद्याथ्र्यासाठी योजना तयार करून शेवटच्या घटकार्पयत पोहोचवित होतो, त्या योजना आता पूर्णत: बंद करून फक्त सरकारचे काम करणा:या उद्योगपतींना पोषण अशाच योजना सुरू आहे. त्यामुळे लघु उद्योजक व शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. केवळ सरकारच्या फसव्या आणि स्वप्नाळू आश्वासनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारचा खरा चेहरा सर्वासमोर आणण्यासाठी व शहादा येथे होणारी हल्लाबोल सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने कामाला लागण्याचे आवाहन केले.
या वेळी ईश्वर पाटील यांनी सरकारची प्रत्येक धोरणे फोल ठरले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. आपण मागील निवडणुकांमध्ये विभागलो गेलो आणि ती चूक झाली. ती चूक सुधारण्याची वेळ आली असून, आपसातील मतभेद विसरून एकजुटीने येणा:या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी राजेंद्र वाघ, बाबा शाह यांनी मनोगत व्यक्त केले.
 

Web Title: This is the time to bring the government to power: Planning of attacking movement in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.