तळोद्यात नऊ जोडपी विवाहबंधानात : सामुहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:00 PM2018-02-26T13:00:20+5:302018-02-26T13:00:20+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : ख्याजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी, तळोदातर्फे आयोजीत मुस्लिम समाज सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा तळोदा येथे पार पडला़
शहरातील बढरी कॉलनीत रविवारी सकाळी ख्वाजा वेल्फेर सोसायटीतर्फे या सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
या विवाह सोहळयात मौलाना शोएब रजा नुरी यांनी नऊ जोडप्यांना विवाह बंधनात बांधले. विवाह सोहळ्या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गावीत, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, योगेश चौधरी, भाजपा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, माजी उपनगराध्यक्षा रुक्सनबी अब्बासअली, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, रामानंद ठाकरे, प्रकाश ठाकरे, जालंधर भोई, संदीप परदेशी, रोहिदास पाडवी, किरण सूर्यवंशी, जगदीश परदेशी, सावित्रीताई पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या नऊ वर्षापासून ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर सोसायटी तळोदातर्फे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा घेण्यात येतो. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वेल्फेअरचे अध्यक्ष सै. रईस अली अब्बासअली, शोएब रजा नुरी, उपाध्यक्ष मुख्तार शाह अब्बास शाह, सचिव साबीर अली सबदर अली, सहसचिव अय्या हाजी साबान अन्सारी, तळोदा मुस्लिम समाज अध्यक्ष शेख सरदार शेख उमराव, सल्लागार अश्पाक अली अब्बास अली, शेख फकिरा शेख कुददुस पिंजारी, माजी अध्यक्ष मुस्लिम समाज रुकनोद्दीन शे. हिदायतुल्ला व मुस्लिम समाज युवकांकडून परिश्रम घेण्यात येत आहेत़