माहेरुन पाच लाख आणावेत म्हणून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:26 PM2019-10-18T12:26:35+5:302019-10-18T12:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माळीवाडा येथील माहेर तर एरंडोल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील माळीवाडा येथील माहेर तर एरंडोल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आह़े फेब्रुवारी 2017 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान छळ करण्यात आला होता़
माधुरी महेंद्र जगताप यांचा विवाह महेंद्र मधुकर जगताप रा़ एरंडोल यांच्यासोबत झाला होता़ दरम्यान माधुरी यांनी नंदुरबार येथील माहेरुन 5 लाख रुपये आणावेत यासाठी छळ करण्यात येत होता़ वेळावेळी मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती़ दरम्यान त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने सासरच्यांनी काढून घेतले होत़े
याप्रकरणी पती महेंद्र, सासू लताबाई जगताप, सुभाष रामदास जगताप, लिलाबाई सुभाष जगताप, राहुल सुभाष जगता सर्व रा़ एरंडोल व संजय आनंदा माळी व रुपाली संजय माळी यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सामुद्रे करत आहेत़
खांडबारा येथील विवाहितेचा छळ
नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील सासर तर सारंगखेडा ता़ शहादा येथील माहेर असलेल्या शितल कमलेश पानपाटील यांचा सासरच्यांनी छळ केला़ पती कमलेश आनंदा पानपाटील, सासू वत्सलाबाई आनंदा पानपाटील दोघे रा़ खांडबारा तसेच कांतीलाल आनंद पानपाटील, रेखा कांतीलाल पानपाटील, सुनिता राजू वेंदे सर्व रा़ मढी ता़ महुआ सुरत यांनीमे 2017 ते जुलै 2019 या काळात विवाहिता शितल यांना शारिरिक व मानसिक त्रास दिला होता़ स्वयंपाक येत नसल्याचे तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन पतीसह सासरच्यांकडून वेळोवेळी मारहाण करण्यात आली होती़
याप्रकरणी बुधवारी विवाहिता शितल पानपाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती कमलेश पानपाटील याच्यासह सर्व चार संशयितांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़