बालिकेवर अत्याचार करणा:या युवकास सात वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:54 AM2019-02-15T11:54:51+5:302019-02-15T11:54:55+5:30
नंदुरबार : नवापूर येथील अल्पवयीन बालिकेवर तरुणासह अल्पवयीन मुलाने केलेल्या अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने युवकास दोषी ठरवून सात वर्ष सश्रम ...
नंदुरबार : नवापूर येथील अल्पवयीन बालिकेवर तरुणासह अल्पवयीन मुलाने केलेल्या अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने युवकास दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुस:या अल्पवयीन मुलावर बाल न्यायालयात खटला सुरू आहे.
नवापूर येथील बेलदार वाडा भागात पिढीत अल्पवयीन बालिका राहते. त्याच भागात दोन घरे सोडून राहणारा फय्याज गुलाब खाटीक व त्याचा अल्पवयीन भाऊ राहत होता. त्यांच्या घरात पाळलेले मांजर आणि फिशटँक असल्याने बालिका ते पहाण्यासाठी नेहमीच तेथे जात होती. या ओळखीचा फायदा घेवून आधी फय्याज याने शेकोटीसाठी कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने घेवून जावून एका घराच्या स्नानगृहात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दुस:या दिवशी फय्याजचा भाऊ यानेही बालिकेला खेळायला जावू असे सांगून त्यांच्या घराच्या स्नानगृहात नेवून अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर दोघांनी तीन ते चार वेळा बालिकेवर अत्याचार केला. 15 जानेवारी 2016 रोजी देखील अत्याचार केला. अखेर मानसिकदृष्टया खचलेल्या बालिकेने आई व काकूला ही बाब सांगितली. नंदुरबार येथे राहणा:या बालिकेच्या काकाला ही बाब सांगितल्यावर ते नवापूरात गेल्यावर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरिक्षक संगिता कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
नंदुरबार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालला. न्या.राजेश गुप्ता यांनी सर्व साक्षीदार तपासले. पिढीत मुलगी, तिची काकू, आणखी एक बालसाक्षीदार व तपास अधिकारी संगिता कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने फय्याज खाटीक यास सात वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी, आणखी दुस:या कलमाअंतर्गत तीन वर्ष कारावास, दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्यापैकी सहा हजार रुपये पिढीत बालिकेस देण्याचे आदेश दिले. दुसरा अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयात खटला सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.तुषार कापडीया यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुनील धनगर होते. सरकारी वकील, तपास व पैरवी अधिकारी यांचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकिल सुशील पंडित यांनी कौतूक केले.