प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे लावून पर्यटनस्थळ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:08 PM2020-07-26T13:08:22+5:302020-07-26T13:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील उनपदेव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पर्यटन स्थळावरील प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील उनपदेव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पर्यटन स्थळावरील प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे लावून पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. राज्य सरकारचा हा आदेश अद्याप कागदावरच असल्याने शहादा तालुक्यातील उनपदेव पर्यटनस्थळ मात्र पर्यटकांनी गजबजले असल्याचे दिसून येत होते. यामुळे कोरोनाचा शिरकाव या आदिवासी पट्ट्यात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
गेल्या चार महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळवाणे झालेले नागरिक शहादा तालुक्यातील गरम पाण्याचा झरा असलेल्या उनपदेव येथे गर्दी करीत असल्याचे दिसून येत होते. या अनुषंगाने स्थानिक वीरपूर येथील ग्रुपग्रामपंचायतीने युवकांच्या मदतीने प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे लावून बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी पर्यटकांनी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उनपदेव येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.