कार्तिक अमावस्येनिमित्त काशिनाथ बाबा मंदिरात पारंपरिक धार्मिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:17 PM2019-11-30T14:17:00+5:302019-11-30T14:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे रस्त्यावरील काशिनाथ बाबा मंदिरात कार्तिक अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे रस्त्यावरील काशिनाथ बाबा मंदिरात कार्तिक अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होत़े प्रारंभी काशिनाथ बाबा मंदिरात ध्वज मिरवणुक काढण्यात आली़ यात मोठय़ा संख्येने भाविक सहभागी झाले होत़े पन्नास वषार्पासून ध्वजारोहणाचा पारंपरिक उपक्रम होत आह़े
धुळे चौफुली जवळच्या वाघेश्वरी माता मंदिरामागील टेकडीवर श्री काशिनाथ बाबांचे मंदिर आहे. याठिकाणी दरवर्षी कार्तिक अमावस्येला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत़े श्री काशिनाथ बाबांवर श्रद्धा असल्याने येथे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील भाविक हजेरी लावतात़ मंगळवारी प्रारंभ झालेल्या धार्मिक उपक्रमात शेकडोंच्या संख्येने भाविक उपस्थित होत़े गवळी समाज बांधवांसह राज्यभरातील भाविकांनी दिलेल्या सहभागातून 50 वर्षापूर्वी काशीनाथ बाबांचे मंदिर उभारण्यात आले आह़े
मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने भाविकांनी श्रमदानातून पायवाट तयार केलेल्या पायवाटेने मंदिरात जाता येत़े मंदिरात नंदुरबार पालिका प्रशासनाने वीज, पाणी आणि रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी भाविकांची आह़े दरम्यान मंगळवारी सकाळी 10 वाजता बालवीर चौकातून सवाद्य ध्वज मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी ध्वजाचे मानकरी काशिनाथ हिरणवाळे होत़े सोबत कलशधारी महिला व भाविक होत़े देसाईपुरा, मोठा मारुती मंदिर, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली, ज्ञानदीप सोसायटीमार्गे मंदिरात पोहचली. याठिकाणी होम-हवन, पूजा अर्चना झाली. दुपारी महाप्रसाद देण्यात आला़ यशस्वीतेसाठी काशिनाथ बाबा सेवा समिती आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतल़े