पुलावर खड्डय़ांमुळे वाहतुकीला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:11 PM2019-07-05T12:11:07+5:302019-07-05T12:11:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सोरापाडा, अक्कलकुवा गावालगतच्या वरखेडी नदीवरील पुलावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी ...

Traffic on the bridge due to potholes | पुलावर खड्डय़ांमुळे वाहतुकीला खोळंबा

पुलावर खड्डय़ांमुळे वाहतुकीला खोळंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सोरापाडा, अक्कलकुवा गावालगतच्या वरखेडी नदीवरील पुलावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी आणि चिखल साचल्याने यातून वाट काढत पादचा:यांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे या पुलावर वारंवार वाहतूक खोळंबत असून, शहरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 
शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कललकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलाचे खड्डे गेल्या महिन्यातच बुजविण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यामुळे या पुलावरील खड्डय़ांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचून पुलास तलावाचे स्वरुपच आले आहे की, काय असे चित्र दिसून येत आहे. 
पुलावर चिखलाचे पाणी साचून डाबके तयार झाल्याने सोरापाडा येथे जाणा:या शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरील डबक्यांमध्ये साचलेल्या चिखलमय पाण्यामुळे वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने विद्याथ्र्याच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत.  
या पुलावर सकाळपासूनच साचलेल्या चिखलमय पाण्याच्या डाबक्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ-मोठय़ा रांगा लागल्यामुळे दुपारी दोन वाजेर्पयत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जामली नर्सरी ते मोलगी रोडर्पयत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन वाजेनंतर वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवारसह कर्मचा:यांना यश आले. 
अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलावरील डबक्यांमध्ये चिखलमय पाणी साचल्याने सोरापाडा येथे जाणा:या शाळकरी मुलांच्या  अंगावर हे घाण पाणी उडून नये म्हणून वाहनधारक जीव धोक्यात घालीत मार्गक्रमण करत आहेत. त्यातच वाहनधारकांच्या गर्दीमुळे पुलावर धोकादायक स्थिती निर्माण होत असून, ते अपघातास कारणीभूत ठरू पहात आहे. मात्र याकडे संबधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शाळकरी मुलांसह वाहनधारकांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: Traffic on the bridge due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.