चालकाकडून लाच घेताना वाहतूक नियंत्रक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:04 AM2019-06-05T11:04:27+5:302019-06-05T11:04:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एक दिवस किरकोळ रजा घेत घरी राहणा:या एसटी चालकाला वारंवार निलंबित करण्याची धमकी देत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एक दिवस किरकोळ रजा घेत घरी राहणा:या एसटी चालकाला वारंवार निलंबित करण्याची धमकी देत त्याच्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्विकारणा:या वाहतूक नियंत्रकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली़
मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ नंदुरबार आगारात चालकाने एक दिवस घरगुती कारणासाठी रजा घेतली होती़ संबधित चालकास वाहतूक नियंत्रक नंदकिशोर वसंत शेवाळे याने गैरहजर राहिल्याने निलंबित करतो असे धमकावले होत़े यातून निलंबन थांबवण्यासाठी चालकाकडून शेवाळे याने 10 हजाराची मागणी केली होती़ यात तडजोड होऊन 8 हजार रुपये देण्याचे ठरले होत़े ही माहिती संबधित चालकाने लाचलुचपत विभागाला कळवत वाहतूक नियंत्रक शेवाळे याच्याविरोधात तक्रार केली होती़ यातून मंगळवारी एसटी आगाराच्या गेटवर आठ हजाराची लाच घेताना वाहतूक नियंत्रक शेवाळे यास अटक करण्यात आली़ ही कारवाई पोलीस अधीक्षक सुधीर कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, करुणाशिल तायडे आदींनी केली़