शहाद्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:50 PM2018-07-31T12:50:28+5:302018-07-31T12:50:41+5:30

शहादा येथील स्थिती : दोंडाईचा रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी हातगाडीवर थाटली दुकाने

Traffic due to encroachment in Shahada | शहाद्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीला

शहाद्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीला

Next
<p>शहादा : शहरातील दोडाईचा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौकात भररस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून हा चौक अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.                 पोलीस व पालिका प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
शहादा शहरातील सर्व रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. मुख्य रस्त्यावरील व भाजी मार्केटमधील विक्रेते व हातगाडीधारकांच्या मनमानी पध्दतीने होत असलेल्या अतिक्रमणाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत 15 दिवसांपूर्वी  भाजी मार्केटमधील अतिक्रमणे काढली. त्यासोबतच हातगाडी धारकांच्या मनमानी अतिक्रमणाला लगाम लावला होता. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईत सातत्य न ठेवल्याने भाजी मार्केटमध्ये पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. सोबतच हातगाडीधारकही रस्त्यावर कुठेही उभे राहून रहदारीचा प्रश्न निर्माण करीत आहे.  त्यासोबतच आता भाजीपाला विक्रेत्यांनी व हातगाडीधारकांनी हा अतिक्रमणाचा  मोर्चा दोंडाईचा रोडवरील शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौक व तेथून थेट खरेदी-विक्री संघार्पयत रस्ता काबीज करीत या मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटले आहेत. शहरात  दोंडाईचा रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर रहदारीची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे.  
या रस्तालगतच शैक्षणिक संस्था, बँका, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह यासह व्यापारी संकुले असल्याने रहदारी मोठय़ा प्रमाणात आहे. नेमक्या याच रस्त्यावरील चौकापासून ते मुख्य रस्त्यालगत 30 ते 40 भाजीपाला व्यावसायिकांसह हातगाडी धारकांनी अतिक्रमण करीत रहदारीचा प्रश्न गंभीर बनवला आहे. भाजी मार्केटमधीलच काही विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनीही हा रस्ता काबीज करीत कोणाचाच धाक नसल्याचे दाखवत अतिक्रमण केले आहे. दिवसेंदिवस या अतिक्रमणात वाढच होत आहे. त्यांच्या मनमानी अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघातही होत असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वाढत आहे. या संवेदनशील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने पोलीस व पालिका  प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत आहे. या रस्त्यावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे तात्काळ हटवली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे    पालिका व पोलीस प्रशासनाने पुन्हा  संयुक्त मोहीम राबवून ही अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Traffic due to encroachment in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.