हातोडा पुलाला भगदाड पडल्याने तळोदा-नंदुरबार वाहतूक थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:27 PM2019-08-10T12:27:21+5:302019-08-10T12:29:32+5:30
तळोदा : शहराजवळील तापीनदीवर बांधलेल्या हातोडा पुलास मोठे भगदाड पडल्यामुळे पूल खचत असल्याच्या भितीने वाहनधारकांमध्ये भिती पसरली़ भगदाडामुळे पुलावरुन ...
तळोदा : शहराजवळील तापीनदीवर बांधलेल्या हातोडा पुलास मोठे भगदाड पडल्यामुळे पूल खचत असल्याच्या भितीने वाहनधारकांमध्ये भिती पसरली़ भगदाडामुळे पुलावरुन अवजड वाहतूकीस बंदी करण्यात आली आह़े भगदाड पडल्याची माहिती प्रशासनाने संबधित विभागास कळवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली़ भगदाड पडल्याने पुलाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े
हातोडा पुलावरील उजव्या बाजूच्या कोप:याकडील भाग खाली खचल्यामुळे मोठे भगदाड पडले आह़े हा प्रकार दिसून आल्यानंतर वाहनधारकांनी प्रशासनाला माहिती दिली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तातडीने भेट देत पाहणी केली़ भगदाडाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला माहिती दिली़ नायब तहसीलदार रामजी राठोड, एस़पी़ गवते, मंडळाधिकारी समाधान गवते हे याठिकाणी हजर झाले होत़े त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार यांना माहिती दिली होती़
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता वर्षा पवार यांच्यासोबत संपर्क केला असता, त्या म्हणाल्या की, खड्डा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पाहणीसाठी अभियंत्यांना पाठवले आह़े पावसामुळे हा प्रकार घडण्याची शक्यता आह़े येथील वाहतूकीच्यादृष्टीने तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना संबधितांना दिलज्या आहेत़
दरम्यान पुलावर भगदाड पडल्यामुळे मार्गावर होणा:या बससेची वाहतूक बंद करण्यात आली आह़े मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
‘