रेल्वेस्थानकातील दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:29 AM2019-08-27T11:29:17+5:302019-08-27T11:29:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये महिलेची छेड काढल्याच्या वादातून रविवारी रात्री रेल्वेस्थानकात दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा ...

Trafficking in railway station, crime against mob | रेल्वेस्थानकातील दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा

रेल्वेस्थानकातील दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये महिलेची छेड काढल्याच्या वादातून रविवारी रात्री रेल्वेस्थानकात दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय छेड काढणा:या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे. 
मुकेश पाटील, मंगेश राजपूत रा.अमळनेर, महेंद्र लालझर रा.नगर अशी छेडखानी करणा:या संशयीतांची नावे आहेत. रात्री साडेनऊ वाजता येणा:या पॅसेंजरमध्ये हा प्रकार घडला होता. महिलेने मोबाईलद्वारे नातेवाईकांना ही माहिती दिली होती. पॅसेंजर येताच नातेवाईकांनी तिघांना ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी नकार देताच जमावाने दगडफेक केली. त्यात पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी जखमी झाले. रेल्वे पोलीस आणि नंदुरबार पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर महिला निघून गेल्याने दुस:या दिवशी ओळख पटवून महिलेला फिर्याद देण्यासाठी रेल्वे पोलिसांनी पाचारण केले होते. सायंकाळी उशीरार्पयत फिर्याद दाखल झालेले नव्हती. 
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणा:या जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जमावातील लोकांची ओळख पटविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.     
 

Web Title: Trafficking in railway station, crime against mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.