नर्मदा काठावरील नऊ केंद्रांवर बोटीद्वारे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:23 PM2020-01-07T12:23:32+5:302020-01-07T12:23:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेवून सकाळीच रवाना करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेवून सकाळीच रवाना करण्यात आले. नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून हे कर्मचारी सरकारी बार्जद्वारे आपल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशीरा पोहचले.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ९० टक्के भाग हा दुर्गम भागाचा आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्र हे दुर्गम भागात आहेत. यापैकी राज्यातील पहिले मतदान केंद्र असलेल्या मणिबेली केंद्राचा देखील यात समावेश आहे. अक्कलकुवा येथून मोलगीमार्गे गमन पॉर्इंटपर्यंत हे कर्मचारी वाहनाद्वारे पोहचले. तेथून नर्मदेच्या बॅकवॉटरमधून ते बार्जद्वारे रवाना झाले. मतदान झाल्यानंतर देखील परतीचा मार्ग त्यांचा असाच राहणार आहे.
भाबरी, उडद्या, भादल या तीन केंद्रांवर जाण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली.