ऑनलाइन नोंदणीअभावी रखडला निधी
By Admin | Published: February 3, 2017 12:47 AM2017-02-03T00:47:04+5:302017-02-03T00:47:04+5:30
तळोदा तालुका : 188 घरकुल लाभाथ्र्याचे बँक खाते नसल्याने नोंदणी प्रक्रियेत खोडा
तळोदा : बँकेच्या खात्याअभावी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांसाठी लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी रखडली आह़े परिणामी निधीचेही वितरण थकले आह़े जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून लाभार्थीचे खाते उघडण्याबाबत सक्त ताकीद द्यावी अशी लाभार्थीची अपेक्षा आह़े
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात यंदा साधारण 694 घरकुले मंजूर करण्यात आली आह़े येथील पंचायत समितीच्या प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत निवड करण्यात आलेल्या यादीतील नावे निश्चित करण्यात आली आह़े थेट लाभार्थीच्या खात्यावर घरकुलाचा निधी जमा करण्याचे स्पष्ट आदेश असल्यामुळे या लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आह़े
तथापि काही बँकेच्या अधिका:यांच्या मनमानी आणि उदासीन धोरणामुळे लाभार्थीचे खाते नंबर उपलब्ध होत नाही़ परिणामी नोंदणीदेखील रखडली आह़े
यामुळे प्रशासनास संबंधित लाभार्थीच्या खात्यावर निधीदेखील वर्ग करता येत नसल्याचे सांगण्यात येत आह़े वास्तविक खाते उघडण्यासाठी लाभार्थी आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांकडे सातत्याने जात आह़े परंतु बँकेचे अधिकारी दाद देत नाही़ याउलट नंतर येण्याचे सांगत टाळाटाळ करीत असल्याचे लाभार्थीचे म्हणणे आह़े
एवढेच नव्हे तर लाभार्थीच्या बँक खात्यासाठी पंचायत समिती प्रशासन व संबंधित गावांचे ग्रामसेवकदेखील बँकाकडे लाभार्थीच्या खात्याबाबत विचारणा करतात़ आधीच प्रधानमंत्री आवास योजनेच्या यंत्रणेने योजना राबविताना कालमर्यादा घालून दिलेली आह़े त्यामुळे घरकुलेही वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आहेत़ परंतु लाभार्थीच्या बँक खात्याअभावी नोंदणी प्रक्रियेत खोडा घातला जात आह़े
पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरद, न्यूबन, करडे, लाखापूर, खरवड व त:हावद या गावांमधील लाभार्थीचे बँक खाते अजूनपावेतो मिळालेले नाही़ याबाबत संबंधित बँकेकडेसुध्दा पाठपुरावा सुरू आह़े मात्र बँकेचे सहकार्य मिळत नसल्याची व्यथा अधिका:यांनी बोलून दाखविली़ जिल्हा प्रशासनाने लाभार्थीच्या खात्यांबाबत चौकशी करून बँक अधिका:यांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावावा, अशी लाभार्थीची मागणी आह़े
दरम्यान, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कालमर्यादित असल्यामुळे संबंधित यंत्रणेकडून लाभार्थीच्या माहितीसाठी सातत्याने तगादा लावला जात आह़े मात्र लाभार्थीच्या बँक खात्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ वास्तविक शासनाने घरकुलांसाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आह़े अशी स्थिती असताना काही बँकांच्या मनमानी धोरणामुळे निधीचे वाटप रखडले असल्याने लाभार्थी यापासून वंचित राहत असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आह़े
घरकूल योजनेसाठी अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आह़े अशा ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या मनाचा हिरमोड होत असल्याचे वृत्त आह़े अनेक लाभार्थी या कारभारावर नाराज असून प्रशासनाने यावर तातडीने काही उपाययोजना आखून ऑनलाइन नोंदणीबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े (वार्ताहर)
तालुक्यातील मंजूर घरकुलांपैकी अजूनही पावणेदोनशे लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी बाकी आह़े त्यांचे बँक खाते नंबर उपलब्ध झालेले नाही़ बँक खात्यासाठी सेंट्रल बँकेच्या बोरद शाखेकडे वारंवार मागणी केली आह़े खाते नंबर मिळाल्याबरोबर तातडीने ऑनलाइन नोंदणी केली जाईल़
-शरद मगर, गटविकास अधिकारी, तळोदा़
बँकेच्या कार्यक्षेत्रातील घरकूल लाभार्थीचे बँकेतील खाते उघडण्याची कार्यवाही सुरू आह़े दोन दिवसात सर्व लाभार्थीना खाते पुस्तक दिले जाईल़
-जितेंद्र कुमार, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, बोरद.