मध्यप्रदेशात पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेवर धडगाव तालुक्यात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:55 AM2020-07-07T11:55:36+5:302020-07-07T11:55:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील खडकी, ता.पानसेमल येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ बाधित महिलेचे कोरोनामुक्त ...

Treatment in Dhadgaon taluka on a woman who tested positive in Madhya Pradesh | मध्यप्रदेशात पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेवर धडगाव तालुक्यात उपचार

मध्यप्रदेशात पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेवर धडगाव तालुक्यात उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्यप्रदेशातील खडकी, ता.पानसेमल येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ बाधित महिलेचे कोरोनामुक्त असलेल्या धडगाव कनेक्शन समोर आले आहे़ महिलेस आधी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़
कोरोनाबाधित महिलेला सिकलसेल अ‍ॅनिमिया आजार असल्याने धडगाव येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान २ जुलै रोजी त्रास वाढल्याने तिला धडगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणले गेले होते़ ही महिला मूळ मध्यप्रदेशाची रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर नंदुरबार येथून बडवानी येथे हलवण्यात आले होते़ याठिकाणी ३ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ दरम्यान या महिलेवर बडवानी येथे उपचार सुरू असले तरी धडगाव येथे उपचारादरम्यान किती व्यक्तींच्या संपर्कात आले किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे़ धडगाव तालुका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
मध्यप्रदेशातील खडकी येथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून बाधित महिला ही पानसेमल तालुक्यातील पहिली कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे़ याठिकाणी एकही कोरोनारुग्ण आजवर आढळलेला नव्हता़

Web Title: Treatment in Dhadgaon taluka on a woman who tested positive in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.