वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टर कुटुंबाकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 06:22 PM2017-08-04T18:22:01+5:302017-08-04T18:26:49+5:30
तीन वर्षात 100 रोपांची लागवड. मोड येथील डॉक्टराचा सामाजिक उपक्रम
ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.4 - कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून पाच वर्षापासून तळोदा तालुक्यातील मोड येथे डॉ.पुंडलिक राजपूत हे वृक्षारोपण करीत आहेत. गेल्या तीन वर्षापासून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करीत त्यांचे संगोपन करीत आहेत. तळोदा तालुक्यातील मोड येथील डॉ. पुंडलिक राजपूत हे डॉक्टर असले तरी त्यांना शेतीची विशेष आवड आहे. निसर्गावर विशेष प्रेम असल्याने तसेच मानवासाठी झाडांचे मोठे योगदान असल्यामुळे या प्रेरणेतून हा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित आहेत. मुला-मुलींच्या वाढदिवसालाही वृक्षारोपण डॉ.राजपूत हे स्वत: व आपल्या मुला-मुलींचा वाढदिवस वृक्षांची लागवड करून साजरा करतात. त्यांचा मुलगा कोटा येथे शिक्षण घेत आहे. त्याचा वाढदिवस ते गेल्या पाच वर्षापासून प्रत्यक्ष कोटा (राजस्थान) येथे जाऊन साजरा करतात. वृक्षाचे महागडे रोप विकत घेऊन एका पार्कमध्ये मुलांच्या हस्ते रोप लावत असतात. दोघ वाढदिवस ते अशाच प्रकारे साजरा करतात. मुलांप्रमाणेच ते वृक्षांवरही तेवढेच प्रेम करतात. 80 टक्के वृक्ष जगली गेल्या तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच असताना शंभर वृक्षांची लागवड केली होती. त्यातील 80 टक्के वृक्ष जगली. त्यावर्षीच एक हजार कडूलिंब, सीताफळ, बांबू, अशी वेगवेगळी वृक्षांची रोपेदेखील विनामूल्य गावातील लोकांना दिली होती. ही रोपटे गावातील नागरिकांनी आपल्या घरासमोर, गावात लावली. ती सर्व वृक्ष जगली आहेत. स्वखर्चातून 100 रोपांची लागवड यंदाही गावातील चंपालाल चौधरी, भगवान गिरासे, ज्ञानेश्वर कोळी, नरोत्तम अहिरे, विलास कोळी, चुनिलाल मराठे, नरेंद्र शिंदे, भरत ठाकरे, सागर मराठे या युवकांसोबत गावातील रिकाम्या जागा व रस्त्यांच्या दुतर्फा स्वत:च्या खर्चातून 100 वृक्षांची लागवड केली आहे. या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतली आहे. गावातील काही तरुणांना सोबत घेऊन स्वखर्चाने 10 लिंबाची रोपे लावली. शिवाय विविध प्रकारची दोन हजार रोपटे स्वत:च्या खर्चातून गावक:यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. - डॉ.पुंडलिक राजपूत