बामखेडा महाविद्यालयात वृक्षारोपण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:25+5:302021-07-17T04:24:25+5:30
संस्थेचे अध्यक्ष जी.आय. पटेल, सचिव बी.व्ही. चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणाला लागून असलेल्या संरक्षक ...
संस्थेचे अध्यक्ष जी.आय. पटेल, सचिव बी.व्ही. चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणाला लागून असलेल्या संरक्षक भिंतीजवळ वृक्षारोपण करून पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे वर्षभर ऑनलाइन अध्यापन करण्यासाठी महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय असे विविध ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपद्वारे प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सी. एस. करंके यांनी सर्व ग्रुपमधील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण पंधरवड्याची जाणीव करून प्रत्येकाने आपल्या घरासमोर अथवा शेतात कमीत कमी दोन झाडे लावून राष्ट्रहिताच्या कार्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन केले. त्याला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. साधारणत: ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.