अभाविपतर्फे तळोद्यात तिरंगा पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:17 PM2020-01-24T12:17:57+5:302020-01-24T12:18:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : युवक सप्ताहानिमित्त येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेतर्फे गुरुवारी शहरातून २४२ फुटाची तिरंगा पदयात्रा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : युवक सप्ताहानिमित्त येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेतर्फे गुरुवारी शहरातून २४२ फुटाची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होत.
या तिरंगा पदयात्रेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री दाज्या पावरा, अभाविपचे नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे, तळोदा शहर अध्यक्ष रवींद्र गुरव, शहरमंत्री प्रेम माळी, न्यू हायस्कूलचे प्राचार्य टवाळे, नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी यांची उपस्थिती होती. न्यू हायस्कूल, चिनोदा रोड, भगवान बिरसा मुंडा चौक, स्मारक चौक, आनंद चौकमार्गे पदयात्रा काढून वामनराव बापूजी मंगल कार्यालय येथे जाहीर व्याख्यान व समारोप झाला. या वेळी प्रमुख वक्त्या प्रज्ञा खैरे म्हणाल्या की, तिरंगाचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत. तिरंगा ध्वज एकतेचे प्रतीक असून आपल्या देशातील प्रत्येकाने या प्रतिकाचा सन्मान केला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन निलेश हिरे तर आभार प्रेम माळी यांनी मानले. या वेळी राजेंद्र गावीत, प्रा.धुमाळ, राहुल पाटील, चेतन पाडवी, चेतन राजपूत, हर्षल चौहान, पंकज पवार, जयेश मराठे, धनंजय पाटील आदींनी नियोजन केले.