आदिवासी आश्रमशाळांचा होतोय कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:29 PM2019-01-05T17:29:07+5:302019-01-05T17:29:19+5:30
तळोदा प्रकल्प : विविध योजना व उपक्रमांमुळे शक्य, विनय गौडा यांची माहिती
नंदुरबार : शासकीय आश्रम शाळांचा कायापालट करण्यात येत असून याअंतर्गत नुकताच आठ पथकांद्वारे सव्रे करून त्यानुसार उपाययोजना व सुधारणा केल्या जात आहे. शाळा व्यवस्थापन समित्या देखील सक्षम करण्यात येत असल्याची माहिती तळोदा प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ‘लोकमत संवाद’ उपक्रमात बोलतांना दिली.
सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. विनय गौडा यांनी आदिवासी आश्रम शाळांचा प्रश्न, सुधारणा, आदिवासींच्या योजना, वन दावे यासह इतर विविध विषयांवर चर्चा केली. तळोदा प्रकल्पाचा पदभार घेतल्यानंतर आपण विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. त्यासाठी सुक्ष्म नियोजन केले. त्याचे परिणाम आता दिसून येत आहे.
असा होत आहे कायापालट
कायापालट अभियान राबविण्यात आले. त्यासाठी आठ पथके स्थापन करण्यात आले. चार ते पाच शाळा मिळून एक पथक होते. या पथकाने बेसलाईन सव्र्हे केला. सर्व बाबी पडताळून पाहिल्या. तसा अहवाल आल्यानंतर अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार आता आश्रम शाळांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. 13 ठिकाणी नवीन होस्टेलच्या बिल्डींग तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 110 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. आश्रम शाळांच्या दुरूस्तीसाठी 10 कोटी रुपयांची कामे मंजुर करण्यात आली. त्यामुळे विद्याथ्र्याना, कर्मचा:यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समित्या
शाळा व्यवस्थापन समितींना देखील सक्षम करण्यात आले आहे. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती मिळून त्यांना पाच लाख रुपयांर्पयत खर्च करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा कामांसाठी प्रकल्प कार्यालयांच्या फे:या मारण्याची गरज आश्रमशाळा व्यवस्थापनांना राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आश्रम शाळांमधील विद्यार्थी टेकAोसॅव्ही व्हावे यासाठी डिजीटल क्लास रूम सुरू करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून प्रत्येक आश्रम शाळेसाठी दोन लॅपटॉप व तीन संगणक पुरविण्यात येत आहेत. लवकरच संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. यापूर्वी आश्रम शाळांना संगणक पुरविण्यात आले परंतु संगणक शिक्षकच नसल्यामुळे त्यांचा काहीही फायदा होऊ शकला नाही.
आदिवासी भागातील विद्यार्थी चपळ असतात. अनेक खेळांमध्ये ते नैपुण्यप्राप्त असतात. परंतु स्थानिक ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे असे खेळाडू मागे राहतात. त्यामुळे प्रत्येक आश्रम शाळेत एक क्रिडा शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आली आहे. गेल्यावर्षी विभागीय प्रकल्पस्तरीयय क्रिडा स्पर्धामध्ये तळोदा सर्वात शेवट होता आता यंदा तिस:या क्रमांकावर आला आहे. अनेक खेळाडू राज्य पातळीर्पयत ेखेळण्यास गेले आहेत.
सेंट्रल किचन योजना
दहा हजार विद्याथ्र्याना जेवण पुरविले जाईल अशी सेंट्रल किचन योजना लवकरच अंमलात येणार आहे. नंदुरबारात हे सेंट्रल किचन राहणार आहे. दोन तासापेक्षा कमी अंतर असलेल्या आश्रम शाळांमध्ये ते पुरविण्यात येणार असून नंदुरबार व तळोदा प्रकल्पातील शाळा त्याअंतर्गत असतील. डीबीटी बाबत संमिश्र प्रतिक्रया आहेत. योजना चांगली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील करणे आवश्यक आहे.
अटल आरोग्य वाहिनी
अटल आरोग्य वाहिनीची महत्त्वाकांक्षी योजना देखील सुरू झाली आहे. तळोदा प्रकल्पासाठी सात रुग्णवाहिका व 14 डॉक्टर मंजुर आहेत. शिवाय आवश्यक स्टाफ देखील मंजुर आहे. टोल फ्री नंबरवर फोन करताच अवघ्या अर्धा तासात रुग्णवाहिका संबधीत आश्रम शाळेत पोहचणार आहे. इतर वेळी रुटीन चेकअप केले जाणार आहे.
वीज पोहचली..
प्रकल्पातील एक आश्रम शाळा वगळता सर्वच आश्रम शाळांमध्ये वीज पुरवठा केला गेला आहे. यासाठी आपण सुरुवातीपासून आग्रही होतो.
50 टक्के रिक्त पदांचा प्रश्न देखील मोठा असून समायोजन करतांना मोठी कसरत करावी लागत असल्याचेही विनय गौडा म्हणाले.
(तीन हजार वनदावे निकाली/हॅलो 4)तळोदा आदिवासी प्रकल्पातील कार्यक्षेत्र हे दुर्गम-अतिदुर्गम भागात विस्तारले असल्याने या भागात काही अडचणी असल्या तरी गेल्या दोन वर्षात चांगली कामे करता आली त्याचे समाधान असल्याचे विनय गौडा यांनी सांगितले. या भागात काम करतांना खूप शिकता आले, आदिवासींचे लोकजीवन, संस्कृती समजून घेता आली आणि त्यांचे प्रश्न व समस्यांवर जे जे शक्य त्या उपाययोजना करता आल्या. विशेषत: आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रम शाळा व वसतिगृहात अनेक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता सुधारण्याचा प्रय} केला. भौतिक सुविधा देण्यासाठी प्रय} केले. आश्रम शाळांची दुरूस्ती असो की नवीन इमारती बांधण्यासाठी नियोजन असो त्याचा पाठपुरावा केला. त्यातून शासनाकडूनही मंजुरी मिळाली आहे. डिजीटलायङोशन आणि क्रिडा क्षेत्रात आदिवासी विद्याथ्र्याना प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रय} केले. त्यामुळे तळोदा प्रकल्पातील सर्वच आश्रम शाळांना क्रिडा प्रशिक्षक मिळाले. या भागात काम करण्याचा अनुभव काही वेगळाच असून त्याची अनुभूती आपण प्रामाणिकपणे घेत असल्याचे प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.