नंदुरबार येथे साकारणार आदिवासी सांस्कृतिक भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 07:07 PM2017-08-12T19:07:39+5:302017-08-12T19:12:35+5:30
आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
Next
ठळक मुद्देनंदुरबार जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या 69 टक्के आदिवासी लोकसंख्यानंदुरबार शहरातील होळ शिवारात होणार आदिवासी भवनजिल्हा नियोजन विभागाने पाठविला प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी14 कोटी 65 लाख रुपयांचा होणार खर्च
ऑ लाईन लोकमतनंदुरबार,दि.12-आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. सुमारे 14 कोटी 65 लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.नंदुरबार जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 69 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी व त्याला व्यासपीठ मिळावे यासाठी स्वतंत्र आदिवासी भवन असावे, अशी मागणी होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. नंदुरबार शहरातील होळ शिवारातील सुमारे दोन हेक्टर जागेत हे भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 14 कोटी 65 लाख रुपये खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन विभागाने हा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या सांस्कृतिक भवनात एक हजार आसनाची व्यवस्था असलेले नाटय़गृह राहील. तसेच आदिवासींच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परिसरात सुविधा करण्यात येणार आहेत.