दारु हद्दपार करण्याचा आदिवासी समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:58 PM2018-04-29T12:58:42+5:302018-04-29T12:58:42+5:30

बैठक : खोडसगाव, शिंदे, वरुळ येथील ग्रामस्थांचा पुढाकार

Tribal society decision to expel alcohol | दारु हद्दपार करण्याचा आदिवासी समाजाचा निर्णय

दारु हद्दपार करण्याचा आदिवासी समाजाचा निर्णय

Next


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : लहान शहादेसह परिसरातील खोडसगाव, शिंदे, वरुळ येथील ग्रामस्थांनी गावात दारुबंदीचा निर्णय घेतला असून लगअसमारंभातही मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या दारुच्या वापरावर बंदी घालण्यात आली आह़े
आदिवासी समाजात पूर्वी लगअसमारंभाचा कार्यक्रम तीन दिवस साजरा करण्यात येत होता़ या दरम्यान, मोठय़ा प्रमाणात दारुचाही वापर होत होता़ परंतु ही पध्दत बंद करावी असे मत समाजातील जेष्ठ मंडळींकडून व्यक्त करण्यात आल़े तसेच केवळ लगअसमारंभातच नव्हे तर संपूर्ण गावातूनच दारु हद्दपार झाली पाहिजे, व यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला ध्यावा, असा मानस अनेकांकडून व्यक्त करण्यात आला़ 
त्यानुसार तिन्ही गावातील ग्रामस्थांनी बैठक बोलावून सर्वानुमते गावात संपूर्ण दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला आह़े बैठकीत ठरवल्यानुसार पहिल्या दिवशी हळद, त्याच दिवशी लगअ व आहेर भोजनाचा कार्यक्रम व दुस:या दिवशी मुख्य लगअसोहळा पार पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आह़े आदिवासी समाजबांधव लगअसोहळा तीन दिवस साजरा करीत असत़ पहिल्या दिवशी हळद लावणे, त्यानंतर रात्रभर चालीरिती प्रमाणे विधी होत अस़े त्यानंतर दुस:या दिवशी आहेर करणे तसेच भोजणाचा कार्यक्रम करण्यात येत अस़े त्यानंतर तिस:या दिवशी लगअसमारंभ आयोजीत करण्यात येत होता़ लगअसमारंभारतही मोठय़ा प्रमाणात दारुचा वापर केला जात अस़े परंतु आता गावातील ग्रामस्थांनी ठरवल्याप्रमाणे गावात दारुबंदी करण्यात आली आह़े त्यासोबतच तीन दिवसांऐवजी दोन दिवसात लगअसमारंभ आटोपण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आह़े

Web Title: Tribal society decision to expel alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.