। तूजविण ठाव न दिसे त्रिभूवनी ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:36 PM2020-07-02T12:36:43+5:302020-07-02T12:36:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : । नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।। हरीणीचे ...

. Tribhuvani did not see Tujvin. | । तूजविण ठाव न दिसे त्रिभूवनी ।

। तूजविण ठाव न दिसे त्रिभूवनी ।

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : । नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।। हरीणीचे पाडस व्याघ्र धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा ।। तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे हो जननी विठाबाई ।। संत कान्होपात्रा यांच्या या ओळी सर्वश्रुत आहेत़ बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मधील आषाढी एकादशी वेळी माऊलींचे मुखदर्शन न झालेल्या भाविकांची हीच गत होती़ जिल्ह्यातील विविध भागात साजरा करण्यात आलेल्या आषाढी सणावेळी लाडक्या विठोबाचे दर्शन न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती़ मात्र कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या उपाययोजनांचे स्वागतही केले आहे़ शहादा, रांझणी ता़ तळोदा, प्रकाशा ता़ शहादा आणि नंदुरबार शहरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले़ दरम्यान भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले होते़ यंदा ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिराकडे जाणाºया दिंड्याही नसल्याने मंदिरांबाहेर शुकशुकाट होता़ नागरिकांनी घरोघरी पूजन करुन घेत आषाढी साजरी केली होती़ वारकरी मंडळांकडून सामाजिक उपक्रमांवर यंदा भर देण्यात आला़


शहादा 

शहादा : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील दोन व म्हसावद येथील विठ्ठल मंदिरांमध्ये केवळ धार्मिक पूजा विधी व आरती करण्यात आले़ काही मंदिरांचे दरवाजे भक्तांविनाचा उघडे ठेवण्यात आली होते़ दरवर्षी मंदिर आवारात लागणाºया भाविकांच्या मोठमोठ्या रांगा कोरोनामुळे यंदा दिसून आल्या नाहीत़ मंदिर आवारात शांतता असला तरीही उत्साह कायम होता़
शहरातील गुजर गल्लीत नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या विठ्ठल मंदिरात पहाटे पाच वाजता धार्मिक पूजा विधी व आरती करण्यात आली़ आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली होती़ यामुळे भाविक लांबूनच दर्शन घेत होते़ प्रत्येक मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता़ पोलीस कर्मचारी, पुजारी आणि भाविकांनी मास्क लावून दर्शन घेतले़ माजी नगरसेवक राकेश सुभाष पाटील, सुनील काशिनाथ पाटील, सचिन पाटील, गिरीश पाटील, तुकाराम पाटील, किशोर पाटील यांनी सहकार्य केले़
शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोई गल्ली जवळील विठ्ठल मंदिराचे बांधकाम असल्याने येथील विठ्ठल-रुख्माईची मूर्ती पूजाविधी साठी बालाजी मंदिरात ठेवण्यात आलेली आहे़ त्यामुळे बालाजी मंदिरात विठ्ठलाची साध्या पद्धतीने पूजाविधी करण्यात आली, मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड़ प्रसन्न सावळे, श्याम जाधव, सुभाष बागुल, पुरोहित विश्वास जोशी यांनी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू असे सूचित केले होते़ त्यानुसार येथे भाविकांविना धार्मिक उपक्रम पार पडले़ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, यासह विविध सूचना केल्या होत्या़ त्यांचे पालन नागरिकांकडून करण्यात आले़
म्हसावद येथील विठ्ठल मंदिरात देखील साध्या पद्धतीने पूजाविधी करण्यात आले़ मंदिराची साफसफाई करण्यात आली होती़ यंदा प्रथमच येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते़ तुकाराम पाटील, पुरुषोत्तम पाटील, भरत पाटील, उत्तम पाटील, गणेश धनगर, सुरेश पाटील यांनी परिश्रम घेतले़
पाडळदा ता़ शहादा येथील मुरली मनोहर कृष्ण मंदिरात आषाढी एकादशी होणारा पारंपरिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला होता़ केवळ मूर्तीची सजावट करुन पाच ते सात भाविकांच्या उपस्थितीत पुजारी शाम जोशी यांनी धार्मिक पूजाविधी केली़ यंदा पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला़ प्रशासनाकडून केवळ हनुमान मंदिर, शनि महाराज मंदिर, कृष्ण मंदिर यांचे ध्वज बदलण्यात आले़ यावेळी उत्तम रोहिदास पाटील, जगदीश पाटील, दत्तात्रय सोनजी पाटील, रतिलाल, भिकन पाटील, शरद पाटील आदींनी परिश्रम घेतले़


रांझणी

रांझणी : तळोदा तालुक्यातील प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक असलेल्या रांझणी येथे विठ्ठल मंदिर परिसर आषाढी असताना निर्जन होता़ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने भाविक लांबूनच दर्शन घेत परत जात होते़
आषाढीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भाविक याठिकाणी हजेरी लावतात़ परंतु यंदा मात्र याउलट स्थिती होती़ लॉकडाऊन नियमांचे पालन करत मंदिर बंद ठेवण्यात आले होते़ आषाढीनिमित्त सकाळी मंदिराचे पुजारी दिलीप जाधव व वैशाली जाधव यांनी विठ्ठलाचे पूजन केले़ तालुक्यासह गावातील भाविकांनी बाहेरुनच विठ्ठलाचे दर्शन घेतले़ आषाढीच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ आयोजित अभंगरंग या महेश काळे यांच्या अभंग किर्तन कार्यक्रमांचा येथील ग्रामस्थांनी आनंद घेतला़

प्रकाशा

प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात साधेपणाने धार्मिक उपक्रम करण्यात आले़ भाविकांसाठी विठ्ठल दर्शन बंद असल्याने अनेक भाविकांनी मंदिराबाहेर थांबून देवाचे दर्शन घेतले़ दरवर्षी होणारा आषाढी उत्सव यंदा होवू न शकल्याने १५० वर्षांची परंपरा खंडीत झाली़
प्रकाशा येथे पंचक्रोशीतील विठ्ठलाचे एकमेव आहे़ हे मंदिर सुमारे १५० वर्षापूर्वीचे आहे. आषाढी एकादशीला या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असायची सात दिवस आधीच भजन किर्तन, जप आदी कार्यक्रम सुरु होत होते़ आषाढीला पूजा विधी करुन पालखी काढण्यात येत होती़ परंतु यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास बंदी असल्याने येथील धार्मिक विधी रद्द करण्यात आले़ परिणामी १५० वर्षांची परंपरा खंडीत करण्यात आली़ बुधवारी याठिकाणचे मंदिर पुजाऱ्यांनी बंद ठेवले होते़ यामुळे आलेल्या भाविकांना दर्शन घेता आले नाही़ बहुतांश भाविक सभामंडपात थांबून विठ्ठलाचे दर्शन घेत परत जात होते़ तर महिला भाविक याच ठिकाणी थांबून विठ्ठलाचे नामस्मरण करत होत होते़ यावेळी भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाला साकडे घालत संपूर्ण विश्व कोरोनामुक्त करत अशी आर्जवयुक्त प्रार्थना केली़
कायदा व सुव्यवस्था पाळत शासनाचे नियमांना अधीन राहून आज द्वार उघडण्यात आले नाही म्हणून भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले़

Web Title: . Tribhuvani did not see Tujvin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.