शहादा-प्रकाशा बायपास रस्त्यावरील डिव्हाइडरमध्ये ट्रॉली घुसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:38+5:302021-01-14T04:26:38+5:30
या रस्त्याचे काम उत्तम प्रतीचे असले तरी ठेकेदाराने केलेले डिव्हाइडर चुकीच्या मार्गाचे असल्याचे जड वाहनचालकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या ...
या रस्त्याचे काम उत्तम प्रतीचे असले तरी ठेकेदाराने केलेले डिव्हाइडर चुकीच्या मार्गाचे असल्याचे जड वाहनचालकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांच्या सोयीनुसार त्यांनी मार्किंग केली नसल्यामुळेदेखील वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड जात आहे. शासनाच्या नियमानुसार डिव्हाइडर लांबूनच दिसला पाहिजे, अशी स्थिती अगोदरच तयार करणे गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात घडणारे अपघात कळत असतात. मात्र, संबंधित रस्ता ठेकेदाराने न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. भविष्यात यापेक्षा मोठा अपघात घडू नये म्हणून ठेकेदाराने डिव्हाइडरवर रंग व रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसेल, असे नियोजन करण्याची मागणी आहे.
डिव्हाइडरच्या मुख्य भागावर रिफ्लेक्टर लावून वाहनचालकाला शंभर-दोनशे फुटांपेक्षा जास्त अंतरावरून दिसेल, अशी उपाययोजना करावी, जेणे करून अपघात टळण्यास मदत होईल.
रमेश श्रीधर झाडे, वाहनचालक मनमाड