विद्युत तारांमुळे ट्रॉलाने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:27 AM2019-08-07T11:27:11+5:302019-08-07T11:27:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अककलकुवा कुंभारखान दरम्यान जामली गावाजवळ पवनचक्कीच्या हॅडॉप्टर घेऊन जाणा:या ट्रॉलाला विद्युत तारा टच झाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अककलकुवा कुंभारखान दरम्यान जामली गावाजवळ पवनचक्कीच्या हॅडॉप्टर घेऊन जाणा:या ट्रॉलाला विद्युत तारा टच झाल्याने पेट घेतला. या अपघातात सहाय्यक चालक पुष्पेंदरसिंग याला विजेचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध झाला.
शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते कुंभारखान दरम्यान मंगळवार सकाळी सात वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. राजकोट येथून कर्नाटकमधील पेल्हारी येथे पवनचक्कीचा हॅडॉप्टर घेऊन जाणा:या ट्रॉलाचा (क्रमांक जीजे 01- सीएक्स 1609) महामार्गाववर असलेल्या विद्युत तारांशी संपर्क आला. सहाय्यक पुष्पेन्दरसिग कडक्टर याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शॉट सर्कीटमुळे पेट घेतल्याने कंटेनरचे पुढील सहा व मागील सहा असे बारा टायर जळाले. पोलीस निरीक्षक मेघ:शाम डांगे कर्मचा:यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस पथकासह तेथे जमलेले नागरीकांनी रस्त्याच्या बाजुला जमलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यामधील पाण्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तोर्पयत तळोदा पालिकेच्या अगिAशमन बंबाने आग विझविण्यात आली.