नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:19 PM2018-04-24T13:19:27+5:302018-04-24T13:19:27+5:30

उन्हाळ्याचा परिणाम : ‘ओ पॉङिाटिव्ह’ वगळता सर्वच रक्तगटांचा तुटवडा

Trouble in blood bank in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : जिल्ह्यातील रक्तसाठय़ात मोठा तुटवडा निर्माण झाला आह़े ‘ओ पॉङिाटिव्ह’ रक्तगट वगळता इतर सर्व गटातील रक्तसाठय़ात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे रक्तदान शिबीरांची संख्या वाढविण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध रक्तगटांचा 24 बॅग इतका रक्तसाठा शिल्लक आहे तर, 29 बॅग रक्तसाठा हा ‘रिझर्व’ ठेवण्यात आला आह़े
 जिल्ह्यातील अपघातांची स्थिती, गरोदर मातांच्या प्रसुतीची संख्या बघता इतका अत्यंल्प रक्तसाठा असणे चिंताजनक आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा शिल्लक नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असत़े 
उन्हाळ्याचा परिणाम
उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ उन्हाळ्यात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते तयार होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े उन्हाळ्यात साधारण काळापेक्षा जास्तीची उर्जा खर्ची पडत असत़े तसेच उकाडय़ात घाम निघत असल्याने यातूनही ब:यावेळी थकवा, अशक्तपणा जाणवत असतो़ जीवाची लाही लाही होत असते व त्यातच रक्तदानामुळे अधिकच थकवा येत असल्याचेही अनेक रक्तदात्यांकडून सांगण्यात येत असत़े परिणामी रक्तदान शिबीरेही अत्यंत कमी होत असतात़ त्यामुळे साहजिकच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़
इतर जिल्ह्यातून होतेय आयात
उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज लागलीच तर, जळगाव, नाशिक तसेच औरंगाबाद येथून रक्तासाठा आयात करण्यात येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल़े परंतु अचानक एखादा अपघात झाला आणि रक्ताची मोठी मागणी असली तर लगेच रक्तसाठय़ाची व्यवस्था कशी होणार हासुध्दा प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील बहुतेक परिसर हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे म्हणजे शिवधनुष पेलण्यासारखे आह़े येथील गरीब आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधाच व्यवस्थित उपलब्ध होत नसतात व त्यात, रक्तदान करणे हे त्यांना जगावेगळे वाटत असत़े त्यामुळे दुर्गम भागातही एखादी रक्तदान शिबीर घेतल्यास या शिबीराला प्रतिसाद मिळेलच असे नसत़े जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने रक्तदान शिबीर, तसेच रक्तदान करण्याबाबतचे जनजागृती कॅम्प घेण्यात येत असतात़ परंतु यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत़े अनेक वेळा, मोलगी, धडगाव आदी दुर्गम भागातही शिबीरांचे आयोजन करण्यात येत असत़े परंतु रक्तदान करण्यामागचे गांभीर्य अद्यापही अनेकांना पटलेले नसल्याने रक्तदान करणा:यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच इतर रक्तपेढय़ामध्येही रक्तसाठय़ाचा तुटवडा असल्याचे दिसून आल़े
 

Web Title: Trouble in blood bank in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.