पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:23+5:302021-09-18T04:33:23+5:30
दुर्गम भागातील बँकांमध्ये गर्दी धडगाव : तालुक्यातील बँकांमध्ये नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव गर्दी करत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासह घरकुलांचे ...
दुर्गम भागातील बँकांमध्ये गर्दी
धडगाव : तालुक्यातील बँकांमध्ये नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव गर्दी करत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासह घरकुलांचे हप्ते काढण्यासाठी ही गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सातपुड्यात पावसाळ्यात इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होऊन कामकाज बंद पडत असल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
उपाययोजनांअभावी नागरिक हैराण
नंदुरबार : तळोदा ते नंदुरबार दरम्यान राकसवाडा चाैफुलीवर उपाययोजना करण्याबाबत उदासिनता आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी असून, साईडपट्ट्या चांगल्या दर्जाच्या कराव्यात, अशी अपेक्षा आहे. याठिकाणी अपघात होत आहेत. या भागात रहिवासी वसाहती वाढल्या असल्याने नागरिकांची वर्दळही वाढली आहे.
दरडींचे व्यवस्थापन यंदाही शून्यच
नंदुरबार : अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात कोसळणाऱ्या दरडींचे व्यवस्थापन यंदा शून्यच असल्याचे दिसून येत आहे. सातपुड्यात पावसाळ्यात दरडी कोसळून रस्ते वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यानंतर बांधकाम विभागाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.