परीक्षा केंद्रांबाहेर हुल्लडबाजांचा त्रास
By admin | Published: February 28, 2017 11:43 PM2017-02-28T23:43:48+5:302017-02-28T23:43:48+5:30
इंग्रजीचा पहिलाच पेपर : विसरवाडी केंद्रात एका विद्याथ्र्यावर कॉपीकेस
नंदुरबार : जिल्ह्यातील 20 परीक्षा केंद्रांवर 12 वीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली़ इग्रजीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी काहींनी विनाकारण धडपड केल्याने नंदुरबार शहरात गोंधळ निर्माण झाला़ तथापि जिल्ह्यात सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडल्या़
माध्यमिक शिक्षण विभागाकडून या परीक्षांसाठी चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती़ नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांत परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यानी भेटी देत पाहणी केली़ शहरातील डी़आऱ हायस्कूल, एकलव्य विद्यालय, नूतन कन्या विद्यालय, हि़गो़श्रॉफ हायस्कूल, डॉ़ काणे विद्यामंदिर, शिक्षणशास्त्र महाविद्यालय या परीक्षा केंद्रांच्या परिसरात टारगट गोंधळ घालत होत़े यामुळे परीक्षार्थी विद्याथ्र्याना त्रास जाणवत होता़
यंदा जिल्ह्यातील 16 हजार 331 विद्यार्थी 12 वीची परीक्षा देत आहेत़ या परीक्षांर्थीसाठी जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत़ यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने आठ कस्टडोयन, आठ पर्यवेक्षक, व चार भरारी पथकांची नियुक्ती केली आह़े
4इंग्रजी पहिल्या पेपरला 16 हजार 074 विद्याथ्र्यानी हजेरी लावली़ तर तब्बल 257 विद्यार्थी गैरहजर होत़े नवापूर तालुक्यातील विसरवाडी परीक्षा केंद्रात भरारी पथकाने भेट देऊन विद्याथ्र्याची झडती घेतली़असता एका विद्याथ्र्याकडे कॉपी आढळून आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली़ शहादा, तळोदा अक्कलकुवा, धडगाव व नवापूर तालुक्यातील केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडल्याची माहिती आह़े
दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील एका परीक्षाकेंद्रासमोर प्रश्न पत्रिका फोडल्याची आवई उठवण्यात आली़ उत्तरांची ङोरॉक्स प्रत घेत काही युवक घेऊन मोटारसायकलींवरून वाटत फिरत होत़े यात इंग्रजी विषयातील प्रश्नांची उत्तरे लिहिल्याचे दिसून येत होत़े परिसरातील ङोरॉक्स बंद असतानाही प्रती तत्काळ काढण्यात येऊन पालकांकडून त्या प्रत खरेदी करण्यात आल्या़