उसाने भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:34 PM2020-12-24T13:34:08+5:302020-12-24T13:34:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  म्हसावद, ता.शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाजवळील कन्हेरी नदीला लागून असलेल्या वळण रस्त्यावर बुधवारी पहाटे उसाने ...

A truck full of sugarcane overturned | उसाने भरलेला ट्रक उलटला

उसाने भरलेला ट्रक उलटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद :  म्हसावद, ता.शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाजवळील कन्हेरी नदीला लागून असलेल्या वळण रस्त्यावर बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात चालक व क्लिनर बचावले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने सुटकेचा निश्वास घेण्यात आला.
 याबाबत असे की, बुधवारी पहाटे बोरद, ता.तळोदा येथून ऊसाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच १८ - एम ७७६१ हा मध्यप्रदेशातील दुर्गा खांडसरी येथे जात होता. नदीला लागून असलेल्या वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव जाणारा ट्रक कन्हेरी नदीत उलटला. यात ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहे. या दोघांनाही ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, म्हसावद गावाजवळील ग्रामीण रूग्णालयापासून तर अनकवाडे पुलापर्यंतच्या कन्हेरी नदीला लागून असलेल्या रस्त्यावरील पुलावरील संरक्षक भिंत जमिनीला लागून आहे. याठिकाणी वळण रस्ता असूनही संरक्षक भिंत नाही. परिणामी भरधाव जाणाऱ्या वाहनचालकास रस्ता रूंदीकरण समजून येत नाही. त्यासाठी संरक्षक भिंतीची उंची वाढवणे आवश्यक झाले आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे तर किरकोळ व्यावसायिकही रस्त्याला लागूनच अतिक्रमणावर दुकाने लावतात. परिणामी वाहनचालकास इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती उभी राहते. तरी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: A truck full of sugarcane overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.