शहाद्यात ट्रकला अचानक लागलेल्या आगीने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:36 PM2019-08-11T12:36:14+5:302019-08-11T12:36:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लागल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तात्काळ पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत ट्रकचा पुढील भाग जळून खाक झाला आहे.
शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणा:या शरीफ बागवान यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एम.एच.39 एडी- 0695) उभा होता. शहरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ट्रक घरासमोरच एका मोकळ्या जागेत उभा करण्यात आला होता. शुक्रवारी रात्रीही पावसाची रिमङिाम सुरू असताना बागवान कुटुंब व परिसरातील सर्वजण झोपेत असताना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आगीच्या ज्वाला भडकताना काही जणांना दिसून आल्या. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता ट्रक जळताना दिसला. नागरिकांनी तात्काळ शरीफ बागवान यांना उठवून ट्रकला आग लागल्याचे सांगितले. ट्रकला पुढील बाजूने आगीच्या ज्वालांनी वेढले होते. ट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना घटनेची माहिती देण्यात आली. पालिकेचे दोन्ही अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पहाटे तीन वाजेच्यास सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोर्पयत ट्रकचा पुढील मुख्य भाग जळून खाक झाला होता. ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, पावसाची रिमङिाम असतानाही ट्रक कशामुळे पेटला, कुणी माथेफिरूचे काम तर नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.