जिल्ह्यात ‘तुटी’चा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:05 PM2020-07-21T12:05:04+5:302020-07-21T12:05:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. सरासरी २६ टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस देखील सर्वत्र सारखाच झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात देखील अपेक्षीत वाढ झालेली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या काळात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने अपेक्षा लागून आहेत.
जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. परंतु सर्वच भागात पावसाचे प्रमाण सारखे राहिले नाही. त्यामुळे पेरण्या देखील पुर्ण क्षेत्रात झालेल्या नाहीत. लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी साठा होऊ शकला नाही. सरासरी केवळ २९.९ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात ४१ तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात २० टक्के पाऊस झाला आहे.
जुलैपर्यंतचा अंदाज चुकला
जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीचा निम्मे पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. परंतु तो फोल ठरला. तब्बल २६ टक्के पावसाची तूट राहिली आहे. ही तूट येत्या काळात भरून निघणार किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. सुदैवाची बाब म्हणजे हवामान खात्याने येत्या काळात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा लागून आहे.
पेरणीही अपुर्ण
जिल्ह्यातील एकुण व लक्षांक असलेल्या क्षेत्रावर देखील खरीप पेरण्या होऊ शकल्या नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत केवळ ७६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या काळात अर्थात जुलै अखेर उर्वरित क्षेत्रात पेरण्या पुर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थात येत्या काळात पावसाची स्थिती कशी राहील यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत पुर्ण क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या.
प्रकल्पांमध्ये २५ टक्के साठा
जिल्ह्यातील ३६ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात फारशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षी झालेल्या सरासरीपेक्षा अधीक पावसामुळे सर्व लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले होते. उन्हाळ्यात देखील एकही प्रकल्प कोरडा झाला नव्हता. गेल्या वर्षाचा पाणी साठा अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नव्याने पाणीसाठा वाढला नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के पाणीसाठा आहे.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात मात्र समाधानकारक अर्थात ४० टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नसल्याचे चित्र आहे. याशिवाय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दरा, राणीपूर, धनपूर यासह इतर प्रकल्पांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघड्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. आता जुलै अखेर सर्व पाणी सोडून दिले जाणार आहे.
यापुढेही पावसाने ताण दिला किंवा सरासरीपेक्षा कमी झाला तर यंदा पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभाग आणि खाजगी संस्थाच्या अंदाजानुसार आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा सरासरीइतका अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.