बारावीचा निकाल ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:30 PM2020-07-17T12:30:11+5:302020-07-17T12:30:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहिर ...

Twelfth result is 80 percent | बारावीचा निकाल ८० टक्के

बारावीचा निकाल ८० टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहिर केला़ यात जिल्ह्याचा निकाल हा ८०़३५ टक्के एवढा लागला असून साडेबारा हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ जाहिर निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे़ तिन्ही विद्याशाखांमधून एकत्रिपणे ८४़ टक्के मुली तर ७७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत़
राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या़ जिल्ह्यातील ११३ कनिष्ठ महाविद्यालयांच्या १५ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा दिली होती़ जाहिर झालेल्या निकालात यातील १२ हजार ४६६ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ दुपारी १ वाजेनंतर शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहिर करण्यात आला़ लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असली तरी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांचे कौतूक करण्यात येत होते़ जिल्ह्यातील सहा तालुक्यांची टक्केवारी यंदाच्या निकालात सुधारली असल्याने निकालातून दिसून आले आहे़
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकांना निकालांची प्रतिक्षा होती़ विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकालाचे अवलोकन केले आहे़ आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर सोशल मिडियातून नातेवाईक व आप्तेष्टांकडून त्यांना शुभेच्छा संदेश देण्यात येत होते़
अक्कलकुवा तालुक्यातील १७ कनिष्ठ महाविद्यालयातून १ हजार ८०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ यातील १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तालुक्याचा निकाल ८४़८९ टक्के आहे़
धडगाव तालुक्यात ६ ज्युनियर कॉलेजेमधील ९०० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले़ यातील ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे़ तालुक्यातची टक्केवारी ६०़४४ टक्के एवढी आहे़
नंदुरबार तालुक्यात ४० कनिष्ठ महाविद्यालयांचे ४ हजार ५८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ यातील ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ निकाल ७३़३५ टक्के लागला आहे़
शहादा तालुक्यातील २४ महाविद्यालयांचे ३ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील ३ हजार ३३५ विद्यार्थी पास झाले़ तालुक्याचा निकाल ८४़७७ टक्के आहे़
नवापूर तालुक्यात १९ कनिष्ठ महाविद्यालयातील २ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातील २ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल जिल्ह्यातून सर्वाधिक ८७़८७ टक्के एवढा लागला आहे़
तळोदा तालुक्यातील सात महाविद्यालयातून १ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातील १ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण होवून टक्केवारी ८१़५० टक्के राहिली आहे़
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १५ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यातील १५ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यातून १२ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गुणवत्ता श्रेणीत ७९१, प्रथम श्रेणी ५ हजार २११, द्वितीय श्रेणी ६ हजार १२४ तर पास श्रेणीत जिल्ह्यातील ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ परीक्षेदरम्यान जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना आढळल्याने २३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती
जिल्ह्यात परीक्षेसाठी ८ हजार ७४४ मुले बसले होते़ यातील ६ हजार ७५३ मुले उत्तीर्ण झाले़
दुसरीकडे तिन्ही शाखांमधील ६ हजार ९७८ मुलींनी परीक्षा दिली होती़ यातील ५ हजार ८८० मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत़
मुलांच्या तुलनेत मुलींच्या पास होण्याची टक्केवारी ही अधिक असल्याने त्यांनी यंदाही बाजी मारल्याचे दिसून आले आहे़

Web Title: Twelfth result is 80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.