अडीच हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:15 PM2019-06-24T12:15:46+5:302019-06-24T12:15:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : 2017-18 मधील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने तळोदा तालुक्यातील दोन हजार 499 शेतक:यांना अद्यापर्पयत ...

Two and a half thousand farmers are deprived | अडीच हजार शेतकरी वंचित

अडीच हजार शेतकरी वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : 2017-18 मधील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने तळोदा तालुक्यातील दोन हजार 499 शेतक:यांना अद्यापर्पयत शासकीय अनुदान मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतक:यांना लवकरात लवकर शासकीय अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 
गतवर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शासनानेही या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत कापूस उत्पादक शेतक:यांना मदत म्हणून अनुदान दिले होते. त्याअनुषंगाने तळोदा तालुक्यात सात हजार 231 शेतकरी अनुदानास पात्र ठरले होते. परंतु यातील दोन हजार 499 नुकसानग्रस्तांना अद्यापर्पयत अनुदान मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रारंभी तीन हजार 980 लाभाथ्र्याना चार कोटी 23 लाख 35 हजार 142 रुपये वाटप करण्यात आले. यानंतर मार्च अखेर्पयत तीन हजार 242 शेतक:यांसाठी तळोदा महसूल विभागाने तीन कोटी  34 लाख 30 हजार 524 रुपयांची शासनाकडे मागणी केली होती. मात्र त्यापैकी  86 लाख रुपयेच मार्च अखेर  आल्याने ही रक्कम 743 लाभाथ्र्याना देण्यात आल्याने उर्वरित दोन हजार 499 लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित असल्याचे                 चित्र आहे. त्यामुळे संबंधीत वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून उर्वरित लाभाथ्र्यासाठी दोन   कोटी 48 लाख तीन हजार 54            हजार रुपयांसाठी पाठपुरावा करून उर्वरित लाभाथ्र्याना न्याय द्यावा,  अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
दरम्यान संबंधीत वंचित शेतकरी तलाठी कार्यालय व बँकांमध्ये   चकरा मारत असून, या शेतक:यांना अनुदान आल्यावर त्वरित अनुदान देण्यात येईल, असे निवासी नायब तहसीलदार एस.बी. लोमटे यांनी सांगितले.
 

Web Title: Two and a half thousand farmers are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.