वेगवेगळ्या खटल्यात दोघांना जन्मठेप, सात जणांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:01 PM2018-05-18T13:01:31+5:302018-05-18T13:01:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/नंदुरबार : आमोदा शिवारात स्वत:च्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करणा:या शेतक:यावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रय} करणा:या आठ आरोपींपैकी एकास जन्मठेप तर उर्वरित सात आरोपींना 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. तर नंदुरबार जिल्हा न्यायालयाने प}ीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप सुनावली.
घटनेची पाश्र्वभूमी अशी, आमोदा शिवारात प्रजेश मधुकर चौधरी रा.म्हसावद हे स्वत:च्या शेतात 24 जुलै 2016 रोजी दुपारी 2 वाजता ट्रॅक्टरने मशागत करीत होते. त्याचे वाईट वाटून सरदार वाह:या चौधरी (51) रा.मडकानी, राजेश सजन भिल (23), महेंद्र उर्फ आण्णा सजन भिल (20), आंबालाल मगन भिल (25), मगन रायसिंग भिल (25), संदीप सुरेश वळवी (25), मच्छिंद्र पारसिंग वळवी (24), किरसिंग मि:या ठाकरे (52) सर्व रा. आमोदा यांनी संगनमताने हातात काठ्या , दगड, पेट्रोल बॉम्ब, आगपेटी घेऊन प्रजेश चौधरी वर हल्ला चढविला. आरोपी सरदार चौधरी याने प्रजेश वर चाकूने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली उर्वरित आरोपींनी त्यास ट्रॅक्टरवरून खाली पाडून मारहाण केली तसेच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रय} केला होता. त्यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल होऊन सर्व आरोपींना अटक झाली होती पोलिसांनी तपास पूर्ण करून गुन्हाचे दोषारोपपत्र दाखल केले होते.
येथील जिल्हा व सत्र न्यायालय 1 मध्ये या खटल्याचे कामकाज पुर्ण झाले आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. बी.नाईकवाड यांनी सरदार वाह:या चौधरी यास जन्मठेप व चार हजार दंड तसेच इतरांना 10 वर्ष सक्त मजुरी व चार हजार दंड, याशिवाय इतर विविध कलमान्वयेही शिक्षा सुनावण्यात आली. सर्व शिक्षा आरोपींनी एकत्रित भोगावयाच्या आहेत सरकारी वकील स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
दरम्यान, न्यायालय परिसर आणि फिर्यादीच्या घराजवळ आज निकालाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
पत्नीचा खून प्रकरणी पतीस जन्मठेप
खाकरफळी, ता.नवापूर येथे प}ीचा खून प्रकरणी पतीस जन्मठेपची शिक्षा नंदुरबार येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. याबाबतची हकिकत अशी, खाकरफळी, ता.नवापूर येथील भु:या उखा राठोड हा त्याची दुसरी पत्नी विमलबाई सोबत राहत होता. 11 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी दोघांमध्ये भांडण झाले. रोजचेच भांडण असल्यामुळे आजूबाजू वाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प}ीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भु:या राठोड याने विमलबाईच्या डोक्यात सागाच्या लाकडाची जाड फळी मारून तिला जबर जखमी केले. डोक्यातून अती रक्तश्रावामुळे विमलबाईचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत भु:या राठोड विरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हा खटला येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश अभय वाघवसे यांच्या कोर्टात चालला. प्रत्यक्षदर्शी कुणीही साक्षीदार नव्हते. परंतु सदर घटना ही भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारीत असल्यामुळे महत्त्वाचे 11 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षी पहाता न्या.वाघवसे यांनी आरोपी भु:या राठोड याला जन्मठेपची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल गिरीश रघुवंशी यांनी काम पाहिले.