पंतप्रधान मोदींच्या वडनगरचा मेघराज निघाला दोन कोटीच्या लुटीचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 PM2018-10-30T12:23:23+5:302018-10-30T12:23:28+5:30

नवापूर : पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जामतलाव दरम्यान रिव्हॉल्वरचा धाक दाखवत व्यापा:याकडून दोन कोटी 51 लाख 50 हजारांच्या लूट प्रकरणातील ...

Two crore looters of Prime Minister Narendra Modi's Meghraj went missing in Vadnagar | पंतप्रधान मोदींच्या वडनगरचा मेघराज निघाला दोन कोटीच्या लुटीचा सूत्रधार

पंतप्रधान मोदींच्या वडनगरचा मेघराज निघाला दोन कोटीच्या लुटीचा सूत्रधार

googlenewsNext

नवापूर : पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जामतलाव दरम्यान रिव्हॉल्वरचा धाक दाखवत व्यापा:याकडून दोन कोटी 51 लाख 50 हजारांच्या लूट प्रकरणातील प्रमुख आरोपी मेघराज दरबार याच्या नवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 11 ऑक्टोबर रोजी हरी लुटीची घटना घडली होती़ तेव्हापासून पोलीस मुख्य संशयित मेघराज दरबार याच्या मागावर होत़े 
27 वर्षीय मेघराज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव वडनगर जि. मेहसाणा येथील रहिवाशी आहे. नंदुरबारच्या पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी गुजरात राज्यातील मैहसाना जिल्ह्यातील वीसनगरमधून अटक केली. तो बसने अहमदाबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
रायपूर जामतलावाजवळ 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास व्यापा:याना रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत चोरटय़ांनी दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये लुटले होते. या घटनेनंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी गुजरात राज्यातील मैहसाणा शहरातून एक कोटी 22 लाख27 हजार 500 रुपए हस्तगत करत राजेंद्र कानजी पटेल, अमरसिंग चैनाजी ठाकूर, अक्षय शैलेश पटेल, प्रकाश शांतीलाल पटेल, दीपक कुमार हसमुख पटेल, हार्दिक गोविंद पटेल या सहा आरोपींना ताब्यात घेतले होते. नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने मुख्य आरोपीची धरपकड करून 51 लाख रुपये ताब्यात घेऊन अटक केली आहे. आतापयर्ंत लुटीचे एकूण दोन कोटी 41 लाख 50 हजार रूपयांपैकी दोन कोटी 38 लाख 50 हजार रुपए मिळाले असून महाराष्ट्र व गुजरात पोलिस उर्वरित 30 लाख रुपयांचा शोध घेत आहेत.
 दरम्यान मेघराज दरबार यास ताब्यात घेत पोलीसांचे पथक सोमवारी दुपारनंतर नवापूरकडे येण्यास रवाना झाले होत़े रात्री उशिरा हे पथक नवापूर येथे दाखल झाल्याचे सांगण्यात आले आह़े त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आह़े 

Web Title: Two crore looters of Prime Minister Narendra Modi's Meghraj went missing in Vadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.