ंनंदुरबार रेल्वे स्थानकासाठी दोन कोटीचा निधी
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: October 27, 2017 12:17 PM2017-10-27T12:17:44+5:302017-10-27T12:17:44+5:30
डीआरएम जैन : स्थानकाचे पालटणार रुप
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील कर्मचा:यांचे निवासस्थान, गार्डन, स्थानकावरील प्रतिक्षालयातील फर्निचर, रेल्वे रुग्णालय आदी विविध कामांसाठी सुमारे दोन कोटींची तरतुद करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) मुकूल जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
गुरुवारी नंदुरबार रेल्वे स्थानकाची जैन यांच्याकडून पाहणी करण्यात आली़ तब्बल दोन तास त्यांनी रेल्वे रुग्णालय, रेल्व कर्मचा:यांची निवासस्थाने, रेल्वेस्थानक परिसर, खानपान व्यवस्था आदी विविध विभागांची पाहणी केली़ या वेळी रेल्वे कर्मचा:यांच्या निवासस्थानांची त्यांनी गांभीर्याने पाहणी केली़ नंदुरबार रेल्वे कर्मचा:यांची निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत़ रेल्वे कर्मचा:यांसाठी एकूण 66 कॉटर्स आहेत़ त्यातील बहुसंख्येने कॉर्टर्स ही जीर्ण झाली आह़े त्यामुळे त्यातील काहींची डागडुज्जी करणेही शक्य नसून ती पूर्णपणे पाडून त्या जागी नवीन कन्ट्रक्शन करण्यात येणार असल्याचीही माहिती जैन यांनी दिली़ त्यामुळे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सुमारे दोन कोटीच्या निधीची उपलब्धता करण्यात आली आह़े तसेच अधिकच्या पैशांसाठी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या खासदार निधीतून काही कामे करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितल़े दरम्यान, वेस्टर्न मजुर संघाचे महामंत्री चतुर गिरासे यांनीही या वेळी जैन यांच्यासमोर निवासस्थाने, गार्डन, परिसराचे सुशोभिकरन आदी विषयांवर चर्चा केली़