मांडूळ तस्करी करणारे दोघे नवापुरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:34 PM2021-01-07T12:34:57+5:302021-01-07T12:35:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन तस्कर मांडूळ तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना ...

Two forehead smugglers arrested in Navapur | मांडूळ तस्करी करणारे दोघे नवापुरात जेरबंद

मांडूळ तस्करी करणारे दोघे नवापुरात जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन तस्कर मांडूळ तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार नवापूर पोलीसांनी दोन आरोपी, एक मांडूळ प्रजातीचा साप, एक मारुती सुझुकी अल्टो वाहन जप्त केले आहे.नवापूर पोलीसांनी कारवाई न करता वन विभागाकडे सदर दोन्ही आरोपी मांडूळ असा मुद्देमाल देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली. 
नवापूर वनक्षेत्र,नंदुरबार वन विभाग, येथे वन्यजीव अपराध प्रकरणी ०४ जानेवारी २०२१ रोजी वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील इतर आरोपी  यांचा तपास सुरू असून आरोपीस नवापूर न्यायालय हजर करण्यात आले.आरोपींना दिनांक ८ जानेवारी २०२१ पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.अक्कलकुआ येथून आज अरमान अब्दुल, मजीत मकराण यांना अटक करण्यात आली आहे.
मांडूळ तस्करीचा आंतरराज्य टोळीचा नवापूर पोलीस व वन विभागाने पर्दाफाश केला आहे. काळी जादू, अघोरी विद्या, गुप्त धन शोधण्यासाठी, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, सट्टा चे आकडे असे विविध प्रकारच्या अंधश्रद्धेने दुर्मीळ मांडून सापाची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मांडूळाची किंमत लाखांच्या घरात असते.
नवापूर शहर महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मांडूळची तस्करी महाराष्ट्र राज्यातील जंगलातून झाली की गुजरात राज्यातील जंगलातून हा संशोधनाचा विषय आहे.
वनविभागाने मांडूळ संदर्भात कसून चौकशी करत महाराष्ट्र गुजरात राज्यातील अनेक भागात टिम रवाना करीत संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. संशयित आरोपी हाती लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. नवापूर वन विभागातील विश्राम गृहात अनेक मंडळीची अधिकाऱ्यांना भेटीगाठी साठी गर्दी दिसून आली.
दि.वा. पगार वनसंरक्षक धुळे, सुरेश केवटे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग, उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, आर बी पवार, वनक्षेत्रपाल नवापुर यांच्या पथकाने केली आहे. मांडूळ तस्करी संदर्भात अजून किती तस्कराची वन विभाग धरपकड करतो याकडे लक्ष लागून आहे.

धागेदोरे गुजरातला... 
 या मांडूळ तस्करी चे धागेदोरे गुजरात राज्यात गेल्याचे बोलले जात आहे. मांडूळ साप घरात आणल्याने रातोरात मनुष्य करोडपती होतो असे अनेक दशकापासून गैरसमज पसरला गेला आहे. मार्केट मध्ये त्याची मोठी किंमत असल्याने त्यामुळे या मांडूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. यासंदर्भात वन विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे. जंगलात गस्त वाढण्याची गरज आहे. मांडूळ साप दोन्ही बाजूला निमुळता असून दुतोंडी सारखा दिसतो त्याचा खाद्य उंदीर असून कोणालाही चावा घेत नाही शांत प्रिय सर्प जातीचा मांडूळ प्राणी आहे.

Web Title: Two forehead smugglers arrested in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.