दोन पिढ्यांनी पायी चालूनच शिक्षण घेतले तिसऱ्या पिढीचीही तीच गत होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:27 PM2019-12-06T12:27:12+5:302019-12-06T12:27:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन पिढ्या पायीच चालून शाळेत गेल्या, परिणामी काहींचे शिक्षणही पूर्ण होऊ शकले नाही़ आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन पिढ्या पायीच चालून शाळेत गेल्या, परिणामी काहींचे शिक्षणही पूर्ण होऊ शकले नाही़ आता तिसरी पिढीही पायी चालूनच शिक्षणासाठी जात आहे़ त्यांना तरी सुविधा मिळणार का, असा सवाल आहे छोटा धनपूर ता़ तळोदा येथील पालकांचा़ रस्ता असूनही बस नसल्याने या गावातील विद्यार्थी दररोज बोरदच्या शाळेत पायी प्रवास करत असल्याने येथील पालक त्रस्त आहेत़
तळोदा तालुक्यातील बोरद गावापासून पाच किलोमीटर अंतरावर छोटा धनपूर हे गाव आहे़ ३ हजार १०० लोकांची वस्ती असलेल्या या गावात पहिली ते चौथीचे शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळाही आहे़ याठिकाणी सध्या १५१ विद्यार्थी शिक्षण घेतात़ पाचवीच्या वर्गानंतर येथून जवळ असलेल्या बोरद आश्रमशाळा किंवा मग माध्यमिक शाळेत जावे लागते़ या दोन्ही शाळा गावापासून किमान पाच किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी एकमेकांचा आधार घेत पायीच शाळेकडे रवाना होतात़ गेल्या अनेक वर्षात या गावात बसच आलेली नसल्याने शिक्षणासाठी पायपीट करणे हे शिक्षणाचाच एक भाग बनले आहे़ अनेकवेळा अक्कलकुवा आगारात एकतरी बस सुरु करा अशी आर्जव करुन पालकांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे़
याबाबत येथील सरपंच अनिल वळवी यांनी सांगितले की, मुले-मुली दररोज पायीच शाळेत जातात़ अनेकवेळा या भागात फिरणाºया हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतो़ पालक सायंकाळी शेतात थांबून मुलांची वाट पाहतात़ मुले रस्त्याने जाताना दिसली की मगच घराकडे परत येतात़
छोटा धनपूर येथून बोरदकडे पायी जाणाºयात मुलींची संख्या अधिक आहे़ कनिष्ठ महाविद्यालयात जाणाºया या युवतींच्या काळजीने त्यांचे पालक कासावीस होतात़ प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतापपूर मार्गाने बस सुरु करण्याची मागणी आहे़ बोरद ते धनपूर हा रस्ता बाभळीच्या झाडांनी वेढला आहे़ यात हिंस्त्र श्वापदांसह साप फिरत असल्याने बºयाचवेळा पायी चालणेही जिकिरीचे होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़