बिबटय़ाने केल्या दोन शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:15 PM2019-09-24T12:15:59+5:302019-09-24T12:16:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बोरबण शिवारात चारण्यासाठी नेलेल्या शेळ्यांच्या कळपावर बिबटय़ाने अचानक हल्ला करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बोरबण शिवारात चारण्यासाठी नेलेल्या शेळ्यांच्या कळपावर बिबटय़ाने अचानक हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या तर तरुणासह आठ ते 10 शेळ्या जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकाशा येथील रामनगर भागातील आकाश किशोर ठाकरे (23) हा प}ी लक्ष्मी ठाकरेसह सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बोरबण शिवारात लहान-मोठय़ा 50 शेळ्यांना चारण्यासाठी गेला होता. शेताच्या बांधावर शेळ्या गवत खाण्यात मग्न होत्या. तर लक्ष्मीबाई आठ ते 10 फुटावर चारा कापत होती. सोमवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. आकाश झाडाखाली सावलीत विसावा घेत होता. त्याचवेळी कळपातील काही शेळ्या जवळच असलेल्या डबक्यात पाणी पित होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झाडावर दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानक खाली बसलेल्या आकाशवर झडप घातली. त्यात आकाशच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर बिबटय़ाने पंजा मारल्याने जखमी झाला. हा हल्ला पाहून आकाश व लक्ष्मीबाई यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबटय़ाने शेळ्यांवर झडप घातली. बिबटय़ाचा हल्ला होताच शेळ्या बिथरल्याने त्या जीव वाचवत सैरावैरा धावू लागल्या. कळपातील आठ ते 10 शेळ्यांवर हल्ला चढवत जखमी करुन काहींना फरफटत नेले. आकाशने प}ीसह तेथून पळ काढून जवळच्या शेतातील मजुरांना घटना सांगितली. तोर्पयत बिबटय़ानेही पळ काढला होता. घटनेची माहिती कळताच माजी सरपंच जंगा सोनवणे व रामनगरातील रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडताळणी केली असता कळपातील दोन शेळ्या कमी होत्या. त्या बिबटय़ानेच नेल्या असाव्यात, असा अंदाज आहे. जखमी शेळ्यांवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. मात्र शेळ्यांच्या नरडय़ात बिबटय़ाचे दात खोलवर गेल्यामुळे काही शेळ्या अत्यवस्थ झाल्या आहेत.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतक:यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून बोरबण, धुरखेडा शिवारात पिंजरा ठेवून बिबटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.