शहाद्यात एकाच रात्री दोन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 04:17 PM2018-09-10T16:17:13+5:302018-09-10T16:22:09+5:30

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच रात्री तीन घरे फोडून अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़

Two houses in Shahada were split in one night | शहाद्यात एकाच रात्री दोन घरे फोडली

शहाद्यात एकाच रात्री दोन घरे फोडली

Next
ठळक मुद्देअडीच लाखाचा ऐवज लंपास पोळ्यानिमित्त घरमालक गावी गेले असल्याने घरे बंद होती़ अंधाराचा फायदा घेत चोेरटे पसार झाले़

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच रात्री तीन घरे फोडून अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ पोळ्यानिमित्त घरमालक गावी गेले असल्याने घरे बंद होती़

कळंबू येथील विद्यालयाचे शिक्षक समाधान भामरे यांचे सारंगखेड्यातील कळंबू रस्त्यावरील दत्त कॉलनीत घर आहे़ शनिवारी ते कुटूंबासह पोळा सण साजरा करण्यासाठी मेहेरगाव ता़ धुळे येथे गेले होते़ यादरम्यान रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत कपाट फोडले़ कपाटातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि तीन हजार रूपये रोख चोरुन नेले़ येथून बाहेर पडलेल्या चोरट्यांनी लगतच्या शेजारील पंचकृष्ण नगरातील शिक्षक संदीप साठे यांचेही बंद घर फोडून तेथील पाच हजार रूपये रोख आणि ३० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ साठे यांच्या घरात चोर शिरल्याचे शेजाºयांना दिसून आल्यानंतर त्यांनी आरडाओरड  केली़ परंतु अंधाराचा फायदा घेत चोेरटे पसार झाले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली़ सकाळी श्वानपथक आणि ठसेतज्ञांकडून पाहणी सुरु होती़ 

Web Title: Two houses in Shahada were split in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.