खान्देशातील दोन कारागृह अधीक्षक व तीन हवालदारांना उत्कृष्ट सेवा सन्मानचिन्ह
By मनोज शेलार | Published: March 18, 2024 06:16 PM2024-03-18T18:16:52+5:302024-03-18T18:17:53+5:30
कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : खान्देशातील दोन कारागृह अधीक्षक व तीन हवालदार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. त्यात नंदुरबारातील एक, जळगावचे एक, तर धुळ्याच्या तिघांचा समावेश आहे.
कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. यंदा निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. लवकरच एका कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबारचे जिल्हा कारागृह अधीक्षक राजू रामचंद्र देशमुख. धुळे येथील जिल्हा कारागृह अधीक्षक सचिन माधवराव झिंजुर्डे. जळगाव जिल्हा कारागृह हवालदार सुरेश सुखदेव नेवारे, धुळे कारागृह शिपाई धनराज इंदास चव्हाण व नीलेश परशराम जाधव यांचा समावेश आहे.
कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबत संबधितांना पत्र दिले आहे.