लोहारा गावाजवळ अपघातात दोन ठार

By admin | Published: January 21, 2017 12:07 AM2017-01-21T00:07:38+5:302017-01-21T00:07:38+5:30

अज्ञात वाहनाची धडक : शहादा तालुक्यातील घटना

Two killed in an accident near Lohara village | लोहारा गावाजवळ अपघातात दोन ठार

लोहारा गावाजवळ अपघातात दोन ठार

Next


नंदुरबार/शहादा : शेतात विहीर बांधकाम करून मोलमजुरी करणा:या मजुरांच्या दुचाकीला शहादा तालुक्यातील लोहारा गावाजवळ चारचाकी वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना घडली़ गुरुवारी सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े
लोहारा येथील रहिवासी किरण भीमराव बागुल (25) हा राजस्थानातून आलेल्या अमरचंद चांभार (50) व नारायण बन्सी भिल (30) यांच्यासह शहादा परिसरात विहीर बांधकामाचा व्यवसाय करत होता़ बुधवारी किरण बागुल याच्यासोबत अमरचंद व नारायण हे दोघेही लोहारा परिसरात विहिरीची पाहणी करण्यासाठी जात असताना, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने किरण चालवत असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच 39 क्यू 3394 ला कट मारला, यात ही दुचाकी वाहनात अडकल्याने दोघे दुचाकीसोबत वाहनाखाली आले तर एक जण दूर फेकला गेला़ यात जबर मार बसल्याने किरण बागुल व अमरचंद चांभार हे जागीच ठार झाल़े तर नारायण भिल हा गंभीर जखमी झाला़ शहादा ते लोहारा दरम्यान लोहारा फाटय़ावर झालेल्या या घटनेनंतर अज्ञात चारचाकी वाहन घटनास्थळावरून फरार झाल़े दुखापतग्रस्त नारायण भिल याच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े याबाबत विठ्ठल हिरालाल माळी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक नीलिमा सातव करत आहेत़

जखमीवर उपचार
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेवेळी या परिसरातून जाणा:या शेतमजूर आणि शेतक:यांच्या लक्षात ही घटना आली़ दुचाकीस्वारांना गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता़ तर जखमी नारायण भिल यास परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती कळवली़
मयत किरण बागुल हा युवक लोहारा येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आह़े

Web Title: Two killed in an accident near Lohara village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.