दोन लाखांचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:33 PM2019-09-25T12:33:40+5:302019-09-25T12:33:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी बॉर्डर सिलींग पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान खाजगी वाहनातून दोन लाख रुपयांचे अवैध मद्य जप्तीची ...

Two lakh illegal liquor seized | दोन लाखांचे अवैध मद्य जप्त

दोन लाखांचे अवैध मद्य जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी बॉर्डर सिलींग पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान खाजगी वाहनातून दोन लाख रुपयांचे अवैध मद्य जप्तीची पहिली कारवाई मंगळवारी सकाळी आठ वाजता करण्यात आली़ अक्कलकुवा पोलीसांनी ही कारवाई केली़ 
विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर गव्हाळी येथे बॉर्डर सिलींग पॉईंट तयार करण्यात आला आह़े 22 सप्टेंबरपासून येथे नाकाबंदी करुन वाहने तपासण्यात येत आहेत़ मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाबसिंग पावरा, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पाटील, शरद पाटील हे वाहनांची तपासणी करत असताना एमएच 03 एआर 3849 या चारचाकी वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ पोलीसांनी वाहनाची पूर्ण तपासणी केली असता, त्यात 1 लाख 44 हजार रुपये किमतीच्या व्हीस्की व 76 हजार 800 रुपये किमतीच्या बियरच्या बॉटल मिळून आल्या़ वाहनासह पोलीसांनी 3 लाख 70 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ हे वाहन जितेंद्र सोनी रा़ वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा हल्ली मुक्काम नंदुरबार हा चालवत होता़ त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आह़े 
नाकाबंदी केल्यानंतर दोनच दिवसात अवैध मद्याचा मोठा साठा हाती लागल्याने खळबळ उडाली आह़े 
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक पी़टी़ सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांच्या पथकाने केली़  
 

Web Title: Two lakh illegal liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.