नंदुरबार जिल्ह्यात दर तिघांमागे दोनजण तंबाखू खाणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:23 PM2018-02-06T13:23:51+5:302018-02-06T13:23:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तंबाखू व तंबाखू मिश्रीत गुटखा खाण्यामुळे मुखाच्या कर्करोगास सामोरे जावे लागत असले तरी ते खाणा:यांची संख्या काही कमी झालेली नाही. जिल्ह्यात झालेल्या सव्र्हेक्षणात दर तीन लोकांमध्ये दोन लोकं तंबाखू सेवन करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी जागतिक मौखिक आरोग्य दिवस असून त्यानिमित्त जनजागृतीही होत आहे.
तंबाखूची सवय ही समाजाच्या आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट आहे. तंबाखूच्या जागतिक साथीमुळे दरवर्षी सहा मिलियन लोकांचा मृत्यू होतो. त्यातले सहा लाख लोक हे तंबाखू न खाणारे किंवा धुम्रपानन करणारे असून दुस:यांनी सोडलेला धूर श्वसनाद्वारे घेतल्याने मृत्यू पावतात. म्हणजे स्वत:चा काहीही दोष नसतांना हे लोक अकारण बळी पडतात. साधारणत: सहा सेकंदाला एक मृत्यू तंबाखुमुळे होत असतो. ही बाब लक्षात घेता दरवर्षी 5 फेब्रुवारी हा मौखिक आरोग्य दिन पाळला जातो.
राज्यात झालेल्या विविध सर्वेक्षणाची आकडेवारी पाहता राष्ट्रीय कौटूंबिक आरोग्य पहाणीमध्ये सर्व प्रकारच्या तंबाखूचे प्रमाण मोठय़ा लोकांमध्ये 25 टक्के आहे. 2012-13 मध्ये जिल्हास्तरीय घरोघरी व संस्थाच्या केलेल्या सव्रेक्षणात राज्याचे प्रमाण 50 टक्के पेक्षा जास्त दिसते. जिल्ह्यात 65 टक्के पेक्षा जास्त प्रमाण म्हणजे दर तीन मोठय़ा लोकातील दोन किंवा जास्त लोक तंबाखू वापरतात असे दिसते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मुंबई येथील सलाम फाऊंडेशनच्या माध्यमातून हे अभियान सुरू आहे. याअंतर्गत शाळांना तंबाखूमुक्त शाळांचा पुरस्कारही दिला जातो.
विशेष म्हणजे राज्यात तंबाखू युक्त गुटखा विक्रीवर बंदी असतांनाही नंदुरबार जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची विक्री होते. शेजारच्या गुजरात राज्यात गुटखाबंदी नसल्यामुळे तेथून मोठय़ा प्रमाणावर गुटखा आयात केला जातो. शहरातील अनेक पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा विक्री होतो. त्यामुळे शासनाच्या आदेशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. याबाबतही जनजागृती होऊन कारवाई होणे अपेक्षीत आहे.